Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

भूमिपुत्रांना डावलून झालेली केडीएमसीची भरती प्रक्रिया रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

     

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डोंबिवली शहर अध्यक्ष भालचंद्र पाटील यांचे केडीएमसी आयुक्तांना पत्र

              ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नव्या नोकरभरती प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून स्थानिक भूमिपुत्रांना डावलण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाचे डोंबिवली शहर अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी केडीएमसी आयुक्तांना पत्र देत हि भरती प्रक्रिया रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) मार्फत परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून कागदपत्रेही जमा करून घेण्यात आली आहेत. मात्र, या संपूर्ण भरती प्रक्रियेत स्थानिक भूमिपुत्रांचा सहभाग अत्यल्प असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. एक टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणातच स्थानिक उमेदवारांचा समावेश असल्याने ही प्रक्रिया अन्यायकारक असल्याचे म्हटले जात आहे.
याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भालचंद्र पाटील यांनी महापालिका प्रशासनाला निवेदन देत ही भरती प्रक्रिया तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, मागणी मान्य न झाल्यास सर्व भूमिपुत्रांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणावर महापालिका प्रशासनाची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




Post a Comment

0 Comments