Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

डोंबिवलीत पोलिस हवालदाराची आत्महत्या; पोलिस दलात शोककळा

 

                    ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

 विष्णूनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस हवालदार राम मिसाळ यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली असून शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू केला आहे.

प्राथमिक माहितीनुसारआत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून कौटुंबिक कारणेमानसिक ताण किंवा इतर शक्यता लक्षात घेऊन चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे पोलिस विभागातही अनेक प्रश्न निर्माण झाले असून सहकाऱ्यांमध्ये शोकाची लाट पसरली आहे. या घटनेमुळे सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत.


Post a Comment

0 Comments