ब्लॅक अँड व्हाईट (मुरबाड).. रमेश घरत
मुरबाड तालुक्यातील काळू नदीवर होत असलेल्या प्रकल्पास स्थानिक भुमिपुत्रांचा व शेतकऱ्यांचा कडाडून विरोध होत असून या प्रकल्पामुळे १९ गावातील लोकांना कोणताच लाभ होणार नसल्याने भुसंपादनास १ इंचही जमीन न देण्याचा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील तळेगांव ता. मुरबाड येथे झालेल्या एल्गार मेळाव्यात करण्यात आला.
"आधीच राज्यावर नऊ लाख कोटी इतके कर्ज असताना अशा प्रकारचे प्रकल्प पुढाऱ्याने ग्रामीण भागावर लादणे कितपत योग्य आहे हे धरण म्हणजे कमिशन खोरी आहे अशा प्रकल्पातून पैसा कमवायचा आणि तो राजकारणासाठी वापरायचा" असे फार मोठे विधान यावेळी शेतकरी नेते खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करताना केले
यावेळी इंदुताई तुळपुळे यांनी पश्चिम घाट प्रकल्पाच्या अंतर्गत हा प्रकल्प येत असल्याने मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव यांच्यामध्ये विस्थापित होणार आहेत शेकडो एकर खाजगी जमीन या प्रकल्पासाठी संपादित करावी लागणार आहे त्यामुळे हा प्रकल्प कदापि होऊ देणार नाही असे त्यांनी सांगितले
मुरबाड तालुक्यातील काळू धरणाचे पाणी प्रामुख्याने ठाणे आणि नवी मुंबई यांसारख्या महानगरपालिका क्षेत्रांसाठी व औद्योगिक पट्ट्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या २५०० हजार एकर जमिनी या प्रकल्पात जाणार आहेत, त्यांना शेतीसाठी किंवा पिण्यासाठी या धरणातून थेंबभरही पाणी मिळणार नाही. "सुपीक जमीन द्यायची आणि तहानलेले राहायचे, हा कसला विकास?"
सध्या सहा प्रकल्प मुरबाड तालुक्यात आहेत. याच प्रकल्पातून शहरांना पाणीपुरवठा होत आहे. मात्र प्रकल्प ज्या तालुक्यात झालेले आहेत त्या तालुक्यातील प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्यासाठी दररोज हंडामोर्चा काढण्याची वेळ स्थानिक लोकांच्यावर आली आहे. मुरबाड तालुक्यातील अनेक गावे आजही उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करतात. स्वतःच्या तालुक्यातील नदीवर धरण बांधूनही जर स्थानिकांना पाणी मिळणार नसेल, तर हा प्रक्लप कोणासाठी? असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला.
भुसंपादनाच्या मोबदल्यातून पैसा हडपण्यासाठी प्रकल्पाच्या नावाखाली हजारो एकर जमीनी स्थानिक लोकप्रतिनिधी व समृध्दी महामार्गातील गुंतवणूकदारांनी कवडीमोल दराने विकत घेतल्या असून त्यामधून त्यांना कोट्यवधी रुपयांची कमाई करायची आहे. स्थानिक लोकांचा विकासाला विरोध नसून सरकारने याच काळू नदीवर छोटे -छोटे प्रकल्प उभारल्यास मुबलक पाणीसाठा उपलब्ध होईल व शेतकऱ्यांच्या जमीनीही संपादित कराव्या लागणार नाहीत. तालुक्यातील अनेक डोंगरी व सरकारी जागा अनेक गावांमध्ये उपलब्ध असून त्याठिकाणी प्रकल्प करण्यास कोणतीच अडचण नाही. जोपर्यंत सरकार हा प्रकल्प कायमचा रद्द करत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील. गरज पडल्यास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर विराट मोर्चा काढण्याचा इशारा शेट्टी यांनी या एल्गार मेळाव्यात दिला.
यावेळी कुणबीसेना अध्यक्ष विश्वनाथ पाटील , इंदवी तळपुळे , प्रशांत सरकोत , विलास काका देशमुख , हरिष राऊत , किसन आलम , प्रविण देशमुख , काळू नदी परिसर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संभाजी फणाडे , सय्यद शेख , विलास पठारे , गणेश देशमुख , कैलास निमसे , संताजी देशमुख , रोशन चौधरी , विनोद निमसे , भावेश पठारे यांच्यासह बाधित गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpg)



Post a Comment
0 Comments