Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

टिटवाळ्यातील बेपत्ता वृद्ध दांपत्याचा मुरबाडमध्ये मृतदेह आढळला


      मुलीवर छळाचा आरोपतपास सुरू !

                     ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

टिटवाळ्यातून मागील सात दिवसांपासून बेपत्ता असलेल्या वृद्ध दांपत्याचा मृतदेह मुरबाड तालुक्यातील एका निर्जन भागात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी प्राथमिक अंदाजानुसार ही आत्महत्या असू शकते असे नमूद केले असूनसंपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मृतांची ओळख 85 वर्षीय महादू घरत आणि 75 वर्षीय त्यांची पत्नी कमलाबाई घरत अशी झाली आहे. दोघे 23 तारखेपासून बेपत्ता होते. या प्रकरणी त्यांच्या मुलीनेच टिटवाळा पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान मुरबाडमधील निर्जन भागात दोघांचे मृतदेह आढळून आले. माहिती मिळताच मुरबाड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले.

प्राथमिक तपासात असे समोर आले आहे कीमृत दांपत्यावर त्यांच्या मुलीकडून पैशांसाठी आणि संपत्तीच्या मागणीसाठी सातत्याने मानसिक दबाव टाकला जात होता. या छळामुळे ते अत्यंत तणावात होतेअशी माहिती पुढे येत आहे. याच मानसिक तणावातून त्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला असावाअसा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. टिटवाळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मुकेश ढगे यांनी सांगितले कीबेपत्ता तक्रार दाखल झाल्यानंतर शोधमोहीम सुरू होती. आता मृतदेह आढळल्याने तपास मुरबाड पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे.

दरम्यानहे आत्महत्या आहे की काही घातपात याचा सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असूनवृद्धांवरील वाढत्या छळाच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे

Post a Comment

0 Comments