Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण पूर्वेत उन्नत मार्गाच्या प्रस्तावित पुलाच्या विकासकामात बाधित बांधकामाचे पाडकाम

 

                ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण पूर्वेतील उन्नत मार्गाच्या उड्डाण पुलाच्या विकास कामामुळे बाधित होणारी १२बांधकामावर मंगळवारी ४ जे प्रभागक्षेत्र अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त सविता हिले यांच्या पथकाने पाडकाम करीत भुईसपाट केली.  

         कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन ते जगदीश दुगधालय ते रोशन पेट्रोल पंप या उन्नत मार्गांवर प्रस्तावित 24.00मी. रुंदीच्या उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी शिवाजीनगर वालधूनी येथील रस्त्याच्या हद्दीत बाधित होणारी 12 बांधकामे भुईसपाट करण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईत ४ जे सहाय्यक आयुक्त सविता हिले, केडीएमसी सर्वेअर, महापालिका पोलीस, स्थानिक पोलीस तसेच अतिक्रमण पथकातील कर्मचारी व ठेकेदार कडील माणसे उपस्थित होती. हि कारवाई जेसीबीच्या साहाय्याने करण्यात  आली. या पाडकाम कारवाई मुळे उन्नत मार्गाचा टप्प्याचा विकासचा मार्ग मोकळा झाला आहे.



Post a Comment

0 Comments