Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

आगरी युथ फोरमच्या माध्यमातून होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान

 

लोढा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना मदतीचा हात

                ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

आगरी युथ फोरमच्या प्रयत्नातून आणि लोढा चॅरिटेबल ट्रस्टच्या सौजन्याने होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्याचा सोहळा पार पडला. या सोहळ्यास कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनपर विचारांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण, कौशल्य आणि स्वावलंबन यासाठी नवी दिशा मिळत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन आगरी युथ फोरम अध्यक्ष गुलाब वझे आणि लोढा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सौजन्याने झाले होते.


यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार राजेश मोरे, जेष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, ह.भ.प. प्रल्हाद शास्त्री महाराज यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना सहाय्य प्रदान करण्यात आले. शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम पिढी घडवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असून  विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ठोस पाऊल आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश कला, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातील होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना पुढे जाण्यासाठी आर्थिक बळ देणे हा होता. अशा उपक्रमांमुळे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळत असून त्यांच्या भविष्यासाठी नवे मार्ग खुलतात.
       महाराष्ट्राचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते 75 विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. गरजू लोकांना व विद्यार्थ्यांना मदत करणे हे आगरी युथ फोरमचा धोरण आहे त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची भावना आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. या सोहळ्यात दत्ता वझे, नगरसेवक गजानन पाटील, चंद्रकांत पाटील, लक्ष्मण पाटील, बंडू पाटील, पांडुरंग म्हात्रे, रामकृष्ण पाटील, शरद पाटील  यांच्यासह आगरी युथ फोरमचे पदाधिकारी उपस्थित होते.  

Post a Comment

0 Comments