Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याणच्या आधारवाडी,ऊबंर्डे डम्पिंग ग्राऊंडला भीषण आग

 

                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

 कल्याण पश्चिमेतील आधारवाडी, उबंर्डे येथील डम्पिंग ग्राऊंडमधील कचऱ्याला भीषण आग लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आग लागताच संपूर्ण परिसरात धुराचे दाट ढग पसरले त्यामुळे स्थानिक नागरिकांना श्वास घेण्यास प्रचंड त्रास होत आहे.
घटनेची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले.

 अग्निशमन दलाचे जवान पाण्याचे टँकर वापरून आग आटोक्यात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत, मात्र आगीची तीव्रता जास्त असल्याने कारवाई करणे आव्हानात्मक आहे. डम्पिंग ग्राऊंडवर पडलेल्या कडक उन्हामुळे आणि सुका कचरा यामुळे आगीने काही वेळातच उग्र रूप धारण केल्याचे सांगण्यात येत आहे. कचऱ्यातून निघणाऱ्या मिथेन वायूमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.



आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. अनेक ठिकाणी लोकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आरोग्याची चिंता वाढली आहे. आगीच्या घटना वारंवार होत आहेत, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत
विशेष म्हणजे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडला आग लागण्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या काही वर्षांत येथे वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असून, त्याचा गंभीर परिणाम स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यावर होत आहे.

सध्या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन विभागाचे पथक सातत्याने प्रयत्न करत आहेत, तर वाढते प्रदूषण आणि प्रशासकीय व्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे.                              

 " मुख्य अग्निशमन अधिकारी  नामदेव चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता रविवारी दुपारी लागलेल्या उबंर्डे कचरा डम्पिंगला लागलेली आग नियंत्रणात आणून विझविण्यात आली असून  आधारवाडी कचरा डम्पिंगला  रविवारी साडेसहाच्या सुमारास लागलेली आग सहा अग्निशमन दलाच्या बंबानी , तसेच पाण्याचे टँकर सहाय्याने विझविण्याचे काम सुरू असून आगीवर नियंत्रण आणण्याचे अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करीत असून नेमकी आग कशामुळे लागली ,की लावली हे तपासाअंती सामारे येईल."




Post a Comment

0 Comments