Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

उरणमधील लॉजिस्टिक पार्कवर सिडकोचा हातोडा


अनधिकृत बांधकामधारकांचे धाबे दणाणले
उरण मधील इतर ठिकाणी असलेल्या अनधिकृत कंटेनर यार्ड वर कारवाई करण्याची मागणी.

                     ब्लॅक अँड व्हाईट उरण वार्ताहर 
 बेकायदा बांधकामांविरोधात सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागाने कारवाईचा धडाकाच लावला आहे. उरण परिसरातील जांभूळपाडा येथील १ लाख २० हजार ४३७ चौ.मी. जागेवर बेकायदेशीर उभारलेल्या कंटेनर यार्डवर सिडकोने हातोडा चालवला. या कारवाईमुळे अनधिकृत बांधकामधारकांचे धाबे दणाणले आहेत.

बेलोंडाखार लॉजिस्टिक पार्क येथे बेकायदेशीरपणे कंटेनर यार्ड उभारल्याची माहिती सिडकोला मिळाली. त्यानुसार मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या निर्देशानुसार मुख्य नियंत्रक, अनधिकृत बांधकामे (नवी मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको अतिक्रमण विभागाचे अधिकारी अमित राजपूत, स्थानिक पोलीस अधिकारी व सिडको पोलीस पथक, महावितरण विभागाचे अधिकारी, सिडको सुरक्षारक्षक आणि महाराष्ट्र - सुरक्षा मंडळाचे सुरक्षारक्षक यांनी घटनास्थळी जाऊन कारवाई केली.कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे मात्र उरण मध्ये अनेक ठिकाणी बेकायदेशीर बांधकामे, अनधिकृत कंटेनर यार्ड आहेत त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी उरण मधील नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments