Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पालकांनी आपली मुलगी कशी सक्षम होईल याकडे लक्ष द्यावे - महापौर हर्षाली चौधरी

                    ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 
पालकांनी आपली मुलगी कशी सक्षम होईल याकडे लक्ष द्यावे आणि मुलीच्या करिअरला प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन महापौर हर्षाली चौधरी यांनी केले.   कल्याण (प.) येथील सिटी पार्कच्या निसर्गरम्य परिसरात कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि सिटी पार्क मॅनेजमेंट यांच्या सयुक्त विद्यमाने "अहिल्या-जागर-स्त्री  शक्तिचा"या उक्तीनुसार आयोजित करण्यात आलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमात बोलतांना त्यांनी हे प्रतिपादन केले.

महिलांचे योगदान सेलिब्रेट करण्यासाठी हा कार्यक्रम करित आहेात ,सर्व क्षेत्रात महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. महापालिका देखील महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवित आहे अशी माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी दिली.


या कार्यक्रमाची सुरवात सुमधुर उडत्या गाण्यांनी झाली. या सुरावटींवर तरुणाईने ठेका धरल्याने सर्व वातावरण या सुरांनी भारुन गेले. या कार्यक्रमात  "स्टोरी ऑफ चेंज "या आशयाखाली आज तक वृत्तवाहिनीच्या अनुजा धाक्रस, MD Miss India 2020 गजनंदीनी, ठाण्यातील पहिल्या स्टेशन मॅनेजर अपर्णा देवधर, पॉवर लिफटींग मध्ये गोल्ड मेडेल्स मिळवलेल्या गिरिजेश कुमारी, ठाणे जिल्ह्यातील नॅशनल कुस्ती पटू माधवी कुरले या महिलांचा सत्कार महापौर हर्षाली चौधरी, आयुक्त अभिनव गोयल ,अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांचे हस्ते करण्यात आला.

 

विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी बजावलेल्या या महिलांनी आपल्या मनोगतात उपस्थित सर्व महिलांना यशाचा अथक श्रमाने पाठपुरावा करणे बाबत संदेश दिला. या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावलेल्या आठ महिलांचा देखील सत्कार करण्यात आला, त्याच प्रमाणे  बचत गटातील स्वच्छता मार्शल म्हणून नेमणूक केलेल्या महिलांचा तसेच दामिनी पथकातील पोलिस मार्शलचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

 महापालिका क्षेत्रातील निराधार महिलांना आणि बचत गटांना प्रातिनिधीक स्वरुपात अनुदानाचे वितरणही या वेळी करण्यात आले. यावेळी  करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणाने उपस्थित महिला प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी पालिका सदस्य रेश्मा निचळ, शितल मंडारी, अनघा देवळेकर,  महापालिका सचिव किशोर शेळके,  उपायुक्त कांचन गायकवाड, रामदास कोकरे, मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव,सहा. आयुक्त सुषमा मांडगे, समाज विकास अधिकारी प्रशांत गवाणकर  व इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments