ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
जागतिक महिला दिनानिमित्त बचत गटांतील महिलांसाठी “खेळूया खेळ पैठणीचा – होम मिनिस्टर” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन लोकप्रिय नगरसेवक मा. श्री. बाबाजी बाळाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व बी. के. फाउंडेशन यांच्या वतीने उत्साहात करण्यात आले.
महिलांचा सन्मान आणि संस्कृतीचा जप या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला परिसरातील बचत गटांच्या महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहून विविध खेळ, स्पर्धा आणि मनोरंजनात्मक उपक्रमांमध्ये सहभाग घेत कार्यक्रमाचा आनंद लुटला.
कार्यक्रमामध्ये महिलांसाठी विविध खेळ व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. विशेष म्हणजे, महिलांना पैठणीसह विविध आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बी. के. फाउंडेशन आणि नगरसेवक बाबाजी बाळाराम पाटील, तसेच फाउंडेशनचे कार्याध्यक्ष आकाश बाबाजी पाटील, सदस्य शुभम बाबाजी पाटील, सुवर्णा पावशे इतर सदस्य आणि नगरसेविका अर्चना निलेश पाटील उपस्थित होते.
महिलांचा सन्मान, त्यांना प्रोत्साहन आणि समाजात त्यांचे योगदान गौरविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात आले.
.jpg)



Post a Comment
0 Comments