Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

डोंबिवलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ प्रतिमेचा भव्य सोहळा

                 ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर 

डोंबिवली (पश्चिम) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ प्रतिमेचा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. नगरसेवक संदेश हरीशचंद्र पाटील आणि नगरसेविका डॉ. रसिका संदेश पाटील यांच्या पुढाकारातून हा सोहळा पार पडणार असून नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ प्रतिमेवर पुष्पवृष्टी, भव्य सजावट आणि मंगलमय विद्युत रोषणाई करण्यात आली. तसेच शिवकालीन इतिहासाची आठवण करून देणारे भव्य शिवकालीन शस्त्र प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनातून नागरिकांना जुना वारसा आणि पराक्रमाच्या स्मृती जवळून अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

यावेळी प्रसिद्ध वक्ते यशवंत गोसावी यांचे “शिवचरित्र” या विषयावर विशेष व्याख्यान झाले.छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास नागरिकांसमोर उलगडला. शिवचरित्र व्याख्यान सायंकाळी 7 वाजता गोपीनेथ चौक, डोंबिवली (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आले.या भव्य सोहळ्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.

Post a Comment

0 Comments