ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर
Web Brigade Tech Solutions च्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त पत्रकार परिषद घेण्यात आली, ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या मदतीने भारताला जागतिक स्तरावर अधिक स्पर्धात्मक बनवण्याचा विचार मांडण्यात आला. छोट्या शहरातूनही मोठे तांत्रिक उपक्रम उभे राहू शकतात आणि देशाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी Web Brigade Tech Solutions चे CEO श्री. रुपेश भारती यांनी भारतीय व्यवसायांपुढील आव्हानांबाबत बोलताना सांगितले की, अनेक उद्योग आणि स्टार्टअप्सना योग्य तंत्रज्ञान, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि आधुनिक साधनांचा अभाव असल्यामुळे वाढीस अडथळे येतात. “आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल ऑटोमेशन आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर केल्यास भारतीय व्यवसाय अधिक वेगाने प्रगती करू शकतात. आमचा प्रयत्न उद्योजकांना तांत्रिक मदत देऊन त्यांना जागतिक बाजारात स्पर्धा करण्यास सक्षम बनवण्याचा आहे,” असे त्यांनी सांगितले.
तसेच GGUS Foundation आणि We Desi Technologies Pvt. Ltd. चे Director श्री. गगन शिंदे यांनी सांगितले की, भारतात मोठ्या प्रमाणावर प्रतिभावान तरुण आणि नवीन कल्पना आहेत. “योग्य मार्गदर्शन, तंत्रज्ञान आणि संधी मिळाल्यास भारतीय तरुण जागतिक स्तरावर मोठे नवोन्मेष निर्माण करू शकतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इनोव्हेशनच्या मदतीने शाश्वत विकास साधत देशात अधिक रोजगार निर्माण करण्यावर आमचा भर असेल,” असे त्यांनी नमूद केले.
या पत्रकार परिषदेत तंत्रज्ञान, इनोव्हेशन आणि डिजिटल उपायांच्या माध्यमातून भारताच्या प्रगतीत योगदान देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाला विविध वृत्तपत्रे व न्यूज चॅनेल्सचे
.jpg)

Post a Comment
0 Comments