Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण लोकसभा धावणार डबल डेकर कॉरिडॉरवर

खाली रस्ता, मध्ये फ्लायओव्हर आणि वर मेट्रो
कल्याण लोकसभेत वाहतूक व्यवस्थेचा नवा पॅटर्न
खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांना यश

                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 
कल्याण लोकसभा मतदारसंघातून जाणाऱ्या सर्व मेट्रो मार्गिका या डबल डेकर पद्धतीने उभारण्यात येणार आहेत. यामध्ये कल्याण तळोजा मेट्रो १२, कांजूरमार्ग - बदलापूर मेट्रो १४, तसेच ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो ५, दुर्गाडी मार्गे कल्याण - उल्हासनगर - अंबरनाथ - चिखलोली येथे जाणारी ५ अ, शिळफाटा रांजणोली उन्नतमार्ग, वालधुनी ते नेवाळी उन्नत मार्ग हे सर्व वाहतूक प्रकल्प हे डबल डेकर अर्थातच खाली रस्ता वर फ्लायओव्हर आणि जेथून मेट्रो मार्गिका जाणार आहे त्याठिकाणी वरती मेट्रो मार्गिका असे स्वरूप असणार आहे.

 या प्रकल्पांच्या उभारणीसाठी एमएमआरडीए कडून काम सुरू आहे. तर मेट्रो ५ चे पुन्हा दोन टप्प्यात विस्तारीकरण करून ५ ब ( चिखलोली ते बदलापूर ) तर ५ क ( दुर्गाडी ते टिटवाळा ) अशा मार्गिका उभारण्यात येणार आहे. तर मेट्रो १२ चे ही विस्तारीकरण करून मेट्रो १२ ब ( शिळफाटा ते कळवा - मुंब्रा मार्गे ठाणे ) अशी उभारणी करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत सोमवारी मुंबई येथे एक महत्वाची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी या मार्गांचे प्रस्ताव मांडले. एमएमआरडीए प्राधिकरणाकडून देखील याला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला असून, याबाबत लवकरच आराखडा तयार करण्यात येणार आहे. खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने उभारणी होत असलेल्या या प्रकल्पामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतूक व्यवस्थेला नवा आयाम प्राप्त होणार आहे. 


कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांबाबत एमएमआरडीए मुख्यालयात एक महत्वाची बैठक पार पडली. यावेळी बैठकीत मतदारसंघात सुरू असलेल्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी एमएमआरडीए आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, एमएमआरडीए अतिरिक्त आयुक्त अश्विन मुदगल यांची मुख्य उपस्थिती होती. 

यावेळी बैठकीत खालील महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ प्रकल्पचे विस्तारित मार्गिका ५ अ दुर्गाडी नाका ते कल्याणमार्गे उल्हासनगरच्या कल्याण - बदलापूर मार्गाने बदलापूर आणि अंबरनाथ शहराच्या मध्यभागी उभे राहत असलेल्या चिखलोली रेल्वे स्थानकापर्यंत नेण्यात येणार आहे. यामुळे अंबरनाथ, उल्हासनगर आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे गाठणे सोपे होणार आहे. तर मेट्रो ५ ब ही मेट्रो मार्गिका चिखलोली रेल्वे स्थानकापासून थेट बदलापूर पर्यंत नेण्यासाठी आराखडा तयार करण्यात यावा. तर दुर्गाडी येथून थेट टिटवाळा पर्यंत जाण्यासाठी ५ क मेट्रो मार्गिका उभारण्यासाठी ही आराखडा तयार करण्यात यावा. अशा सूचना यावेळी दिल्या.



 या दोन्ही मार्गिका झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल आणि कल्याण पलिकडच्या नागरिकांना ठाणे, नवी मुंबई, मुंबई गाठण्यासाठी विविध मेट्रो मार्गिका उपलब्ध असतील. याबाबत एमएमआरडीए आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मेट्रो १२ चे काम देखील सध्या जलदगतीने सुरू आहे. यातील मार्गात पिलर उभारणीचे, तसेच स्थानक उभारणीचे काम सुरू आहे. याला अधिक वेग देण्याच्या सूचना यावेळी केल्या. याच समवेत १२ अ देखील नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत देखील काम जलदगतीने करण्यात यावे. तर मेट्रो १२ ब चा आराखडा तयार करण्यात यावा. यामध्ये मेट्रो १२ ची एक विस्तारित मार्गिका ही शिळफाटा मार्गे, मुंब्रा - कळवा येथून जाईल आणि त्याची जोडणी पुढे थेट ठाण्याला होईल. अशा सूचना यावेळी दिल्या. 

वाहतुकीचा ताण कमी व्हावा आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी शिळफाटा - रांजनोली येथे द्विस्तरिय (डबल डेकर) रस्ता उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या रस्त्याची उभारणी साठी जलदगतीने निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना यावेळी दिल्या. कल्याण (पूर्व )यु टाईप व श्रीमलंग रस्त्याचे काम जलदगतीने मार्गी लावावे. यासाठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन देखील लवकर करावे. तर या ठिकाणी बाधित होणाऱ्या नागरिकांना जवळील बीएसयुपी घरांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात यावे. तर या दरम्यान या भागात क्लस्टर योजना राबवून येथील नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर बांधून देण्यात यावे. तर व्यवसायिकांना गाळे देण्यात यावे, असे ही सांगण्यात आले.

ऐरोली - काटई फ्री वे दरम्यान आलेल्या काटई नाका येथील बोगद्याचे काम जलदगतीने पूर्णत्वास न्यावे. तर यातील टप्पा ३ साठी लागणाऱ्या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया जलदगतीने पूर्णत्वास न्यावी, अशा सूचना यावेळी खासदार डॉ.शिंदे यांनी दिल्या. यांसह मतदारसंघातील विविध महत्वाच्या प्रकल्पांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.





Post a Comment

0 Comments