ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून एमएसएसआयडीसी आयोजित एमएसएमई रॅम्प कार्यक्रम अंतर्गत भिवंडी येथे महिला सक्षमीकरण आणि व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या प्रशिक्षणामध्ये महिलांना स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करायचा, एमएसएमई नोंदणी प्रक्रिया, शासकीय अनुदान योजना, कमी व्याजदरातील कर्ज, तसेच व्यवसाय नियोजन व मार्केटिंग याबाबत सखोल व प्रत्यक्ष उपयोगी मार्गदर्शन देण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक स्कीलहबचे संचालक आशिष शिंदे, अश्विनी शिंदे व रितेश घुडे यांनी महिलांना उद्योग क्षेत्रातील संधी, आत्मनिर्भरतेचे महत्त्व आणि व्यवसायातील वास्तव परिस्थिती यावर मार्गदर्शन केले. तसेच स्कीलहबचे पंकज आहिरे व संगीता यांनी प्रशिक्षणादरम्यान महिलांच्या शंका सोडवून त्यांना व्यवसायासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करून दिली. हा कार्यक्रम महिलांसाठी केवळ प्रशिक्षण न राहता आत्मविश्वास, प्रेरणा आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची दिशा देणारा ठरला. कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेक महिलांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढील पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला.
.jpg)

Post a Comment
0 Comments