ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
साप्ताहिक ब्लॅक अँड व्हाईट या वृत्तपत्राच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात.त्याच अनुषंगाने ह्या वर्षी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सा. ब्लॅक अँड व्हाईट,दैनिक ठाणे टाइम्स आणि इंडियन टीव्ही न्यूज चॅनेल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामिनी सन्मान सोहळा 2026 डोंबिवलीत आयोजित करण्यात आला होता.
संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक महिलांचे प्रस्ताव ह्या पुरस्कारासाठी प्रति वर्षी येत असतात.त्याच प्रमाणे ह्या वर्षी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक महिलांनी ह्या सोहळ्यासाठी आपले प्रस्ताव सादर केले होते.त्यातील एकूण 60 महिलांचे प्रस्ताव स्वीकारण्यात आले.विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले.सामाजिक शैक्षणिक,सांस्कृतिक , क्षेत्रातील महिलांसोबत लहान मोठा उद्योग व्यवसाय करणाऱ्या महिलांना सन्मानित करून खऱ्या अर्थाने राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा पार पडला.



सदर कार्यक्रमासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर उपमहापौर यांनाही निमंत्रित केले गेले होते.याच सोबत संगीत कला आणि चित्रपट क्षेत्रातील,मान्यवर आणि आरोग्य क्षेत्रातील मान्यवर विशेष अतिथी म्हणून ह्या कार्यक्रमाला लाभले.
मेस्टाचे अध्यक्ष,कीर्तनकार आणि प्रवचनकार,असलेले हभप निलेश महाराज,सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक ,आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य श्री रघुनाथ फडके यांची विशेष उपस्थिती लाभली.त्याच बरोबर देश विदेशात सुप्रसिद्ध असलेली लावणी सम्राज्ञी,आणि अभिनेत्री सौ.विजया कदम,यांच्या सोबत लेखिका,कवयित्रीआणि दिग्दर्शिका प्रज्ञा पळसुले,तसेच संगीत शिक्षक आणि गायिका असलेल्या सौ. रेश्मा फावडे, यांच्या बरोबर डोंबिवलीतील सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ अनघा हेरुर आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ.सुनीता गोगटे.
तसेच महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष असलेले श्री अमित दुखंडे यांची उपस्थिती लाभली होती.मान्यवरांच्या हस्ते सर्व पुरस्कृत महिलांना सन्मानित करण्यात आले.तसेच विशेष अतिथी म्हणून आलेल्या पाहुण्यांनी आपले विचार धन मांडून महिलाना विशेष मार्गदर्शन केले.अतिशय हसत खेळत हा सन्मान सोहळा उत्साहाने पार पडला.
.jpg)




























































Post a Comment
0 Comments