Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

खासदार आपल्या भेटीला - जनता दरबार” उपक्रमाच्या माध्यमातून शेकडो नागरिकांच्या समस्या मार्गी

डोंबिवलीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोडविल्या शेकडो नागरिकांच्या समस्या
थेट संवादातून नागरिकांच्या अडचणी जाणून घेत तातडीने कार्यवाहीच्या सूचना; अनेक प्रलंबित प्रश्नांना मिळाला मार्ग

                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या “खासदार आपल्या भेटीला - जनता दरबार” या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याच्या उद्देशाने  डोंबिवली येथे आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या विविध नागरी समस्या, प्रलंबित कामे आणि प्रशासनाशी संबंधित अडचणी मांडल्या. 


डोंबिवली येथे  शिवसेना मध्यवर्ती शाखेत “खासदार आपल्या भेटीला - जनता दरबार” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या विविध समस्या मांडल्या. खासदार डॉ. शिंदे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाच्या संबंधित विभागांशी समन्वय साधून त्या समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी थेट लोकप्रतिनिधींशी संवाद साधण्याचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि प्रशासनानेही त्या प्रश्नांवर संवेदनशीलतेने व तत्परतेने निर्णय घ्यावेत, या उद्देशाने हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या माध्यमातून नागरिकांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांना मार्ग मिळत असून प्रशासन आणि नागरिकांमध्ये सकारात्मक संवाद निर्माण होत आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना आपल्या समस्या थेट खासदारांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळत असून प्रशासनालाही त्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्यास गती मिळत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

डोंबिवली येथे झालेल्या कार्यक्रमास आमदार राजेश मोरे, कल्याण डोंबिवली महापौर हर्षाली चौधरी, ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम तसेच स्थानिक नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



Post a Comment

0 Comments