ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत कल्याण (पूर्व) येथील पार्वतीबाई कर्वे हॉल, नूतन विद्यालय शाळेजवळ, कोळसेवाडी येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरास प्रमुख उपस्थितीत स्थानिक आमदार सुलभा गायकवाड, उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर, तहसीलदार कल्याण विकास गारूडकर, भा.ज.पा. महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका रेखा चौधरी, स्थानिक नगरसेवक निलेश शिंदे, स्नेहल मोरे तसेच सर्व महसूल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शिबिरामध्ये नागरिकांना विविध महसुली सेवा व दाखले एकाच दिवशी देण्यात आले. यामध्ये उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, तसेच इतर विविध दाखल्यांचे एकदिवसीय वाटप करण्यात आले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला.
शिबिरातून लाभ मिळालेल्या नागरिकांनी महसूल विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक करत महसूल विभागाचे आभार व्यक्त केले.
.jpg)




Post a Comment
0 Comments