ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
आखाती देशांतील संघर्षामुळे नैसर्गिक वायु आणि इंधन पुरवठ्यावर भीषण पडसाद उमटले आहेत. परिणामी, एलपीजी गॅसची टंचाई निर्माण झाल्याने देशातील अनेक शहरांतील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.त्यात काही स्वार्थी आणि राजकीय विरोधक यांचे ठिकठिकाणी सुरू असलेले आंदोलने या मुळे प्रत्येक नागरिक पुढील गैरसोय टाळण्यासाठी आवश्यकता असो वा नसो घरगुती गॅस मिळविण्यासाठी धावपळ करीत असल्याचे चित्र गेले काही दिवस सातत्याने दिसत आहे.
घरगुती गॅस वापरणाऱ्या ग्राहकांकडून अचानक मोठ्या संख्येने मागणी वाढल्याने गॅस वितरक एजन्सी आणि कंपन्यापुढे अटीतटीची लढाई सुरू झाली आहे. त्याच अनुषंगाने एलपीजीचा पुरवठा विस्कळीत झाल्याने हजारो लघु उद्योग, खाणावळी लहान मोठे हॉटेल्स, रस्त्यावर खाद्य पदार्थ विकणारे छोटे दुकानदार फेरीवाले यांसारख्या सर्वांना अनियमित गॅस पुरवठ्यामुळे अचानक मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच अनेक शहरांमध्ये गॅस सिलिंडर्सचा काळाबाजार आणि बेकायदेशीर साठेबाजी रोखण्यासाठी प्रशासनाने विविध शहरांमध्ये धाडी टाकण्याची मोहीम तीव्र केली आहे.
ह्या पार्शभूमीवर कल्याण शहरातील भारत पेट्रोलियम कंपनीकडून गुरूकृपा गॅस एजन्सीच्या माध्यमातून घरगुती ग्राहकांना वेळेवर गॅस सिलेंडर वितरण केले जात आहे.
"नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये व घाबरून जाऊ नये" असे आवाहन भारत गॅस वितरक संघटनेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष महेश तपासे यांनी केले आहे.यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की इराकमध्ये युद्ध परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतू केंद्र सरकारकडून आपल्या देशात पुरेसा सर्व प्रकारचा इंधन साठा उपलब्ध असल्याचे सांगितले आहे.सरकारने LPG गॅसचे उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू केले असून आपल्या देशात सर्व इंधन साठा आवश्यक तेव्हढा आहे.

परंतू युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून अचानक नेहमी पेक्षा जास्त मागणी वाढल्याने कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे.युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होईल या भितीने तसेच गॅस सिलेंडर वेळेवर उपलब्ध होणार नाही अशी अफवा मोठ्या प्रमाणात पसरल्याने ग्राहकांकडून जास्तीची मागणी वाढल्याने तात्पुरती टंचाई निर्माण झाली असून लवकरच सर्व काही ठीक होईल अशी आशा व्यक्त केली आहे.हे सांगतांना त्यांनी कल्याणच्या नागरिकांना आवाहन केले आहे की "भारत पेट्रोलियमची कल्याणच्या आधारवाडी येथे गुरुकृपा गॅस एजन्सी आहे, आम्ही बुकिंग प्रमाणे घरपोच सेवा देत आहोतच, परंतु सध्या ज्या नागरिकांना तातडीची आवश्यकता आहे ते आमच्या आधारवाडी येथील गुरुकृया गोडाऊनवर येऊन गॅस सिलेंडर घेऊन जात आहेत."नागरिकांनी कोणत्याही एजन्सीच्या बाहेर उगीचच रांगा लावून आपला वेळ आणि पैसा खर्च करू नये.सर्वांना गड पुरवठा केला जात आहे. शासनाच्या निर्देशानुसार ज्यांनी गॅस बुकिंग केली आहे. त्यांना ओटिपी नंबर आला आहे. त्यांना गॅस सिलेंडर दिले जात आहे. गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये."
"तसेच शासनाच्या आदेशानुसार कमर्शिअल गॅस सिलेंडरचे वितरण हे प्राधान्यक्रमानुसारच केले जात आहे.आदेशानुसार प्रथम प्राधान्य हे आरोग्य सुविधा केंद्र,जसे रुग्णालये,त्यानंतर घरगुती वापरासाठी पुरवठा दिला जातो आहे,त्यानंतर व्यावसायिक आस्थापनांना म्हणजेच खानावळी,हॉटेल्स,धाबे..वगैरे"
एलपीजी पुरवठा नियमांत सुधारणा
केंद्र सरकारने हा निर्णय एलपीजी (पुरवठा आणि वितरण नियमन) आदेशामध्ये सुधारणा करत घेतला आहे. सुधारित नियमांनुसार, ज्या घरांमध्ये पाइपद्वारे नैसर्गिक वायूचे कनेक्शन उपलब्ध आहे, त्या घरांना घरगुती एलपीजी कनेक्शन ठेवण्यास परवानगी राहणार नाही.
अधिसूचनेत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, पीएनजी कनेक्शन असलेल्या व्यक्तींना घरगुती एलपीजी सिलेंडर ठेवता येणार नाही किंवा सरकारी तेल कंपन्यांकडून त्याचे रिफिल घेता येणार नाही. त्यामुळे अशा ग्राहकांना त्यांचे एलपीजी कनेक्शन परत करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
.jpg)




Post a Comment
0 Comments