ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
पुंडलिक लक्ष्मण म्हात्रे विद्यालयाच्या विद्यार्थिनी व महिला शिक्षकांनी श्री संत सावळाराम महाराज क्रीडांगण येथे सामूहिक लेझीम सादर करून ‘गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद केली आहे. या उल्लेखनीय यशामुळे विद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तसेच विद्यालयाचे संस्थापक सचिव ह.भ.प. श्री. निलेश म्हात्रे यांची ‘मेस्टा’ (MESTA) कल्याण–अंबरनाथ ग्रामीण अध्यक्षपदी निवड झाल्याने हा दुहेरी आनंद साजरा करण्यासाठी विद्यालयाच्या वतीने ‘आनंदोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा आनंदोत्सव १४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.४५ वाजता पुंडलिक म्हात्रे विद्यालयाच्या पटांगणात आयोजित करण्यात आला असून या सोहळ्यास परिसरातील मान्यवर नागरिक उपस्थित होते.
ह्या आंदोत्सवाच्या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. शंकर महाराज म्हात्रे, श्रीमलंग विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सावळाराम म्हात्रे, उद्योगपती गुलाब लोखंडे, रमेश पाटील सर, प्रदीप पाटील सर, शंकर राणे सर, राजेश म्हात्रे सर, सतीश म्हात्रे सर, मुख्याधपिका अर्चना म्हात्रे, मुख्याध्यापिका अमृता मॅडम, कुलकर्णी मॅडम, सारिका मॅडम, मृणालिनी मॅडम, दीपक म्हात्रे सर, विकास म्हात्रे सर, महाराष्ट्र राज्य कृती समिती सदस्य श्री अविनाश उंबासे सर,छत्रपती क्रीडा पुरस्कार व सरस्वती मंदिर चे माजी मुख्याध्यापक श्री.अंकुर अहेर सर, के. व्ही.पेंढारकर कॉलेजचे उपप्राचार्य श्री.उदय नाईक सर,ग्लोबल कॉलेजच्या प्राचार्य सौ.सुप्रिया नायकर मॅडम उपस्थित होत्या.
सर्व मान्यवरांनी श्री.निलेश म्हात्रे सरांना Mesta च्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.श्री.निलेश म्हात्रे यांनी आलेल्या प्रमुख पाहुण्याच्या सहकार्याबद्दल उल्लेख करून त्यांचे आभार मानले.तसेच आपल्या शाळेतील शिक्षकांचे आणि संपूर्ण कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक करून आभार मानले.
.jpg)

















Post a Comment
0 Comments