ब्लॅक अँड व्हाईट अमरावती वार्ताहर
अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अमरावतीच्या संस्थापक अध्यक्षा तसेच सामाजिक कार्यकर्त्या सौ माधुरी सचिन चव्हाण यांची अमरावती आकाशवाणी केंद्र येथे नमस्कार अमरावती या विशेष कार्यक्रमात मुलाखत घेण्यात आली,या मुलाखतीत सौ माधुरी सचिन चव्हाण यांचा एकंदरीत सामाजिक प्रवास, त्यांच्या महिला सबलीकरण याविषयावर करीत असलेल्या कार्याची ओळख,तसेच इतर सामाजिक, शैक्षणिक,आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक या कार्याविषयी त्यांनी माहिती दिली,अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही अनेक वर्षांपासून अमरावती जिल्ह्यात महिलांसाठी व्यावसायिक स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करीत असते,जेथे आजवर हजारो महिला सक्षम झालेल्या आहेत, याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रातही सौ माधुरी सचिन चव्हाण यांचे उल्लेखनिय कार्य आहे व याकरीता अनेक महत्वाचे राज्यस्तरीय पुरस्कार तसेच सन्मानपत्र त्यांना मिळालेले आहे, आपल्या पारिवारीक जबाबदारी पार पाडुन समाजाचे पण आपण काही नाही तरी देणे लागतो,या विचाराने प्रेरीत तसेच याच समाजातील महत्वाचा घटक असलेली महिला ही सक्षम व्हावी या उद्देशाने अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्षा सौ माधुरी सचिन चव्हाण या कार्य करीत आहेत
माधुरी चव्हाण यांच्या अमरावती आकाशवाणी केंद्रावर घेण्यात आलेली मुलाखत यामुळे त्यांच्यावर त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी सामाजिक राजकीय शैक्षणिक साहित्यिक असे सर्व क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदन याचा वर्षाव होत आहे माधुरी चव्हाण यांच्या मुलाखतीसाठी आकाशवाणी मुंबई केंद्राचे सहाय्यक केंद्र निर्देशक डॉक्टर संतोष जाधव यांचे विशेष मार्गदर्शन लाभले
.jpg)

Post a Comment
0 Comments