ब्लॅक अँड व्हाईट नाशिक, प्रतिनिधी
“साहित्ययज्ञ हेच आमचे ध्येय” या ध्येयवाक्याने प्रेरित शुभंकरोति साहित्य परिवार आयोजित चौथे राज्यस्तरीय साहित्य संमेलन रविवार, ८ फेब्रुवारी २०२६ रोजी नाशिक येथे उत्साहात पार पडणार आहे. यंदाचे संमेलन ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या साहित्यसेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे असून त्यांच्या पावन भूमीत त्यांना अर्पण केलेली ही विशेष कुसुमांजली आहे.
पहिले सत्र : साहित्य दिंडी ते पुरस्कार सोहळा
संमेलनाची सुरुवात साहित्य दिंडी, दीपप्रज्वलन व स्वागत समारंभाने होईल.या प्रसंगी प्रमुख मान्यवर : संमेलनाध्यक्ष – सन्मा. नमिताताई किर (मुंबई), उद्घाटक – सन्मा. प्रा. राजश्रीताई शाह (उषा कीर्तने), पुणे प्रमुख पाहुणे – सन्मा. हेमंत कुलकर्णी (नाशिक).
विशेष मान्यवर – सुरेशदादा पवार (नाशिक)स्वागताध्यक्ष – सन्मा. रंजनाताई बोरा (नाशिक) संस्थापिका – सोनालीताई जगताप (मुंबई) अध्यक्षा, शुभंकरोति साहित्य परिवार – प्रा. सुमतीताई पवार.
मुख्य प्रशासिका – डॉ. मायाताई यावलकर.
उद्घाटक प्रा. राजश्रीताई शाह (उषा कीर्तने) यांची मुलाखत डॉ. सुषमा दाते घेणार आहेत.यानंतर विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. “मराठी प्रकाशवाट” व इतर सन्मान. साहित्यसेवेसाठी विविध संस्थांना “मराठी प्रकाशवाट पुरस्कार” प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच शुभंकरोति परिवारातील कार्यकर्ते, लेखक आणि साहित्यसेवकांना विविध गुणगौरव पुरस्कार, उत्कृष्ट लेखन, अभिवाचन, उपक्रम प्रमुख, युवा लेखक आदी सन्मानांनी गौरविण्यात येणार आहे.याच वेळी पाच पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच फेब्रुवारी महिन्यात वाढदिवस असलेल्या सदस्यांना विशेष शुभेच्छा देण्यात येणार आहेत.
दुसरे सत्र : काव्य, गझल आणि अभिवाचन.दुसऱ्या सत्रात विविध साहित्यिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे.
गझल मुशायराध्यक्ष – मा. डॉ. मनोज वराडे.
अभिवाचन अध्यक्ष – मा. कमलाकर राऊत
निमंत्रित काव्यसंमेलनाध्यक्षा – मा. पल्लवी परुळकर
कवी संमेलनाध्यक्ष – मा. रवींद्र यशवंतराव देशमुख
याशिवाय काव्य परीक्षण, सूत्रसंचालन, गणेशवंदना, शुभंकरोति गीत सादरीकरण होणार असून कार्यक्रमाचा समारोप सुरेल भैरवीने होईल.
या राज्यस्तरीय संमेलनातून साहित्य, संस्कार आणि सर्जनशीलतेचा संदेश अधिक व्यापक स्तरावर पोहोचेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
.jpg)


Post a Comment
0 Comments