Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मराठी भाषा दिन

        खंत एक मनातली !

मी मराठी मी मराठी म्हणून अभिमानाने  जगतो आहे महाराष्ट्रात 

जन्मापासून संस्कार घडविले माय मराठी भाषेने 

सर्वकाही शिक्षणही झाले माय मराठी भाषेतून 

थोर साधू संतांची व शौर्य गाथांची भूमी आहे महाराष्ट्र 

असे असताना कां बंद झाल्यात मराठी शाळा याच महाराष्ट्रात 

मराठी शाळा वाचविण्यासाठी कां जागरूक होत नाही मराठी माणूस याच महाराष्ट्रात 

मराठी भाषा व मराठी समाजमन कां जपले जात नाहीत याच महाराष्ट्रात 

मराठी शाळा व मराठी भाषा जपल्या नाहीत तर होईल उध्वस्त मराठी संस्कृती याच महाराष्ट्रात 

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला केंद्रस्थानी परंतु मराठी शाळाच नसतील तर कसा टिकणार मराठी भाषेचा अभिजात दर्जा ?

मराठी संस्कृती ,लोककला ,व भाषेची परंपरा भावी पिढी पर्यंत कशी पोहोचणार ?

रोपवाटिकाच उध्वस्त झाली तर भविष्यात मराठी भाषेचा वटवृक्ष कसा बहरेल ?

मराठी शाळा वाचली तरच मराठी भाषा टिकेल 

मराठी भाषेचा अभिमान असावा प्रत्येक मराठी नागरिकास 

जागर व्हावा मराठी भाषा टिकविण्याचा 

निर्धार व्हावा मराठी शाळा वाचविण्याचा 

मराठी शाळा बंद होऊ नयेत यासाठी आग्रही असावे याच महाराष्ट्रात 

हीच एक खंत आहे मराठी मनाची 


प्रदीप पंढरीनाथ जोशी 

जेष्ठ वृत्तपत्र लेखक व मुक्त पत्रकार,घणसोली ,नवी मुंबई

Post a Comment

0 Comments