ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या "लाईटहाऊस: कौशल्य विकास व शाश्वत उपजीविका" या कार्यक्रमाने यशस्वीपणे ५ वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. २१ जून २०२१ रोजी दोन्ही संस्थांमध्ये सामंजस्य करार झाला असून, रामचंद्र टॉकीज, पेंडसे नगर, डोंबिवली येथे पहिले केंद्र आणि अटाळी, आंबिवली येथे दुसरे कौशल्य विकास केंद्र सुरू आहे. या उपक्रमांतर्गत युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि आत्मविकासाचे धडे दिले जात आहेत.
या प्रकल्पांतर्गत युवकांना मोफत ऑटोकॅड, सायबर सुरक्षा, ग्राफिक डिझायनिंग, हार्डवेअर नेटवर्किंग, लॅपटॉप व मोबाईल दुरुस्ती, SAP Fico, वेब डिझायनिंग, टॅली, डिजिटल मार्केटिंगसह ४० हून अधिक कौशल्य विकास कोर्सेस, तसेच करिअर मार्गदर्शन आणि आत्मविकासाचे प्रशिक्षण पुरवले जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगार मिळवण्यासाठी आवश्यक सुविधा आणि कंपन्यांशी जोडणी करण्यात मदत केली जाते.
डिसेंबर २०२५ पर्यंत ४४३६ युवक-युवतींनी लाईटहाऊस प्रकल्पात सहभाग घेतला असून, १२८३ युवक-युवतींनी व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केले आहे. यापैकी १८१८ युवक-युवतींना रोजगार मिळाला असून, उर्वरित लाभार्थी विविध कोर्समध्ये प्रशिक्षण घेत आहेत. या उपक्रमात ६६% महिलांनी सहभाग नोंदवला आहे, ज्यामुळे महिलांच्या सक्षमीकरणाला चालना मिळाली आहे. केडीएमसीच्या उपआयुक्त कांचन गायकवाड या यांनी प्रकल्पाला नुकतीच भेट दिली.
रोजगारक्षम कौशल्ये, व्यक्तिमत्व विकास आणि योग्य मार्गदर्शनाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक युवकाला उद्योजकतेसाठी तयार करत आहोत. कल्याण-डोंबिवली शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवकांना संधीच्या मुख्य प्रवाहात आणणे हे आमचे प्राथमिक ध्येय असल्याचे केडीएमसीच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी सांगितले.
तर हा कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने तरुणांसाठी केलेला पहिला भागीदारी करार असून, या केंद्राद्वारे कल्याण-डोंबिवलीतील तरुणांसाठी कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. कल्याण-डोंबिवलीतील तरुणांना लाईटहाऊस कार्यक्रमाचा लाभ घेण्याचा आग्रह असून, या प्रकल्पामुळे शहरातील अल्पउत्पन्न वस्तीतील तरुणांना नवीन दिशा मिळत असल्याची प्रतिक्रिया केडीएमसीचे समाज विकास अधिकारी प्रशांत गवाणकर यांनी दिली.
.jpg)



Post a Comment
0 Comments