मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत.
मराठी भाषा भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक असून, महाराष्ट्रचे प्राकृतिक आधुनिक रूप आहे. मराठीचे वय सुमारे २४०० वर्षे आहे. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून मराठी भाषेला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. मराठी भाषेचा इतिहास सुमारे १५०० वर्षांहून अधिक जुना आहे, ती प्राचीन प्राकृत आणि अपभ्रंश भाषांमधून विकसित झाली, आणि आजच्या स्वरूपातील मराठीचा वापर ८ व्या ते १० व्या शतकात आढळतो, तर १० व्या शतकातील शिलालेख आणि १२ व्या शतकातील साहित्य हे त्याचे पुरावे आहेत.आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भर पडत आहे.त्यानंतर मुकुंदराज व ज्ञानेश्र्वर हे सर्वमान्य आद्य मराठी कवी मराठीची वैशिष्ट्ये तिच्या सामर्थ्यासह मांडताना दिसतात. शके १११० मधील मुकुंदराजांनी रचलेला विवेकसिंधु हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे. ज्ञानेश्र्वरांनी 'परि अमृतातेही पैजा जिंके।
मराठी भाषेचा निश्चित शोध लागल्याची तारीख सांगणे कठीण आहे, कारण ती संस्कृत, पाली आणि प्राकृत (महाराष्ट्री) या भाषांमधून हळूहळू विकसित झाली आहे; परंतु इ.स. १००० च्या सुमारास शिलालेखांमधून आणि ताम्रपटांमधून तिचे अस्तित्व दिसते, तर १२ व्या शतकातील 'लीळाचरित्र' आणि 'ज्ञानेश्वरी' (इ.स. १२९०) यांसारख्या ग्रंथांनी या भाषेला साहित्यिक स्वरूप दिले.
महाराष्ट्र राज्य निर्मिती झाली आणि त्याच दिवशी मराठीला अधिकृत राजभाषेचा दर्जा मिळाल्याने या दिवशी प्रशासकीय स्तरावर हा दिवस साजरा केला जातो.विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी आधुनिक मराठी गद्याला आकार दिला, म्हणून त्यांना 'आधुनिक मराठी गद्याचे जनक' म्हणतात.केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) यांनी कवितेला स्वच्छंदी आणि मुक्त रूप दिले, म्हणून त्यांना 'आधुनिक मराठी काव्याचे जनक' म्हणतात.
थोडक्यात, मराठी भाषेचा विकास अनेक व्यक्तींच्या योगदानातून झाला आहे, पण आधुनिक मराठीच्या विकासात विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि केशवसुत यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते.
२७ फेब्रुवारीला शाळा-महाविद्यालयांमध्ये निबंध स्पर्धा, काव्यवाचन, भाषणे आणि मराठी साहित्य दिन आयोजित केले जातात. 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा करताना मराठी भाषेचा वापर वाढवणे आणि तिचा प्रचार करणे हे आपले कर्तव्य आहे.
मराठी भाषा ही आमची मातृभाषा आहे, जी आपल्याला संस्कार आणि संस्कृती शिकवते. "भाषा मरता देशही मरतो", त्यामुळे आपल्या मायबोलीचे संवर्धन करणे, तिच्यात बोलणे आणि तिचे जतन करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.
"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ,
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी..!"
सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
.jpg)


Post a Comment
0 Comments