Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

ठाकरे गटाचे गटनेते उमेश बोरगावकर यांचे आयुक्त, महापौर, उपमह्पौरांना पत्र

तौलानिक सदस्य संख्याबळाबाबत खुलासा

करण्याची शिवसेना ठाकरे गटाची मागणी

      शिवसेना ठाकरे गटातून निवडून आलेले नगरसेवक राहुल कोट, मधुर म्हात्रे आणि नगरसेविका स्वप्नाली केणे यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणी केली आहे मात्र कोणत्याही गटात नोंदणी केलेली नाही. त्यामुळे कोकण विभागीय आयुक्तांनी दिलेल्या पत्रानुसार  तौलानिक सदस्य संख्याबळानुसार सदस्य संख्या 119 आहे. 

                    ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कोकण विभागीय आयुक्त यांच्या तौलानिक सदस्य संख्याबळ नोंदणी नुसार सदस्य संख्या 119 असून त्यामुळे स्थायी समिती सदस्य आणि स्वीकृत सदस्य पण याच पक्षीय बलाबल प्रमाणे करणार का असा सवाल करत याबाबत खुलासा देण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते उमेश बोरगावकर यांनी केली असून याबाबत त्यांनी केडीएमसी आयुक्तांसह महापौर, उपमहापौरांना पत्र दिले आहे.

 कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत १२२ सदस्य निवडून आले असून सर्वच म्हणजेच १२२ सदस्यांची नोंदणी कोकण विभागीय आयुक्तांकडे विहित प्रक्रिया पूर्ण करून झालेली असताना तौलानिक सदस्य संख्याबळ नोंदणी नुसार के.डी.एम.सी.आयुक्त यांना सादर केलेल्या पत्रात एकूण सदस्य संख्या ११९ दिसत आहे. उर्वरित तीन सदस्यांची नोंदणी झालेली असताना त्यांची कोठेही दखल घेतलेली दिसत नाही. त्यामुळे पक्षीय बलाबल हे सदस्य संख्या ११९ घेऊन करणे सभागृहास बंधनकारक आहे असे सिद्ध होत आहे. त्यामुळे स्थायी समिती सदस्य तसेच स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करताना सभागृहातील एकूण सदस्य संख्या ११९ प्रमाणेच करणे बंधनकारक असेल असे स्पष्ट मत दिसत आहे.

 तरी याबाबत अधिकचा खुलासा करून ११९ सदस्यांच्या नोंदणी नुसार पक्षीय बलाबल नुसार स्थायी समिती सदस्य नियुक्ती तसेच स्वीकृत सदस्य नियुक्ती होणे अपेक्षित आहे. तरी तौलानिक पक्षीय बलाबल हे कोकण विभागीय आयुक्त यांनी दिलेल्या पत्रानुसार एकूण सदस्यांची संख्या ११९ इतकी गृहीत धरूनच तसेच प्रत्येक गटाचे सदस्यांची संख्या नुसार गृहीत धरूनच करणे अपेक्षित आहे किंवा कसे याबाबत खुलासा करण्याची मागणी उमेश बोरगावकर यांनी केली आहे.
शिवसेना ठाकरे गटातून निवडून आलेले नगरसेवक राहुल कोट, मधुर म्हात्रे आणि नगरसेविका स्वप्नाली केणे यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणी केली आहे मात्र कोणत्याही गटात नोंदणी केलेली नाही. त्यामुळे कोकण विभागीय आयुक्तांनी दिलेल्या पत्रानुसार  तौलानिक सदस्य संख्याबळानुसार सदस्य संख्या 119 आहे. 









Post a Comment

0 Comments