Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

खडवली पडघा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य अपघाताची भीती प्रशासन सुस्त

                  ब्लॅक अँड व्हाईट खडवली  वार्ताहर

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 मुंबई नाशिक संलग्न पडघा खडवली रस्त्यावर गेल्या अनेक दिवसापासून खड्ड्यांचे होते साम्राज्य निर्माण झाले आहे या रस्त्यावर कोणत्या क्षणी खड्ड्यांमुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे असे असतानाही त्या रस्त्याची डागडुजी करण्याकडे संबंधित यंत्रणेचे कमालीचे दुर्लक्ष झाल्याने खडवली पडघा रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांनी येत्या दोन ते तीन दिवसात प्रशासनाने व संबंधित लोकप्रतिनिधींनी दखल न घेतल्यास सनद शीर मार्गाने आंदोलन करावा लागेल असा इशारा दिला आहे 

अतिशय रहदारीचा असलेला हा रस्ता राया टिटवाळा गुरवली पडघा असा सलग्न आहे शेकडो नागरिकांची वर्दळ असलेल्या या रस्त्यावर जागोजागी मोठ्या प्रमाणात मोठमोठे खड्डे पडले आहेत परंतु त्याची करण्याकडे संबंधित खात्याचे कमालीचे दुर्लक्ष झाल्याने स्थानिक वाहन चालक व भाविक यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे संबंधित यंत्रणेने तात्काळ कशी दखल घेऊन संबंधित खड्डे व गतिरोधक यांची दुरुस्ती झेब्रा क्रॉसिंग तात्काळ लावावेत अशी मागणी रिक्षा चालकांनी प्रतिक्रिया देताना व्यक्त केली आहे

Post a Comment

0 Comments