ब्लॅक अँड व्हाईट कल्याण, अतुल फडके
"वंदे मातरम" या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण पूर्ती निमित्त रविवारी ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४- ३० वाजता ऐतिहासिक कल्याणाच्या सुभेदार वाड्यात "राष्ट्राय स्वाहा इदम न मम" या विषयावर श्रीमती सुमेधा चिथडे (पुणे) यांच्या दृक- श्राव्य कार्यक्रमाचे आयोजन उज्वला मंडळातर्फे केले आहे.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपली सैन्यदले कर्तव्य बजावत असतात. अशांसाठी सियाचेन लेह सारख्या दुर्गम भागात ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प श्रीमती. सुमेधा चिथडे यांनी उभारला आहे ,तरी देश प्रेमी नागरिकांनी या अनुभव कथनाचा लाभ घ्यावा व सैन्याच्या अडचणी दूर करण्यासाठीच्या निधी संकलनात जास्तीत जास्त योगदान ही द्यावे. असे आवाहन उज्वला मंडळाच्या अध्यक्षा- सौ. सुनीता केळकर यांनी केले आहे .उज्वला मंडळाचे हे ७६ वे वर्ष आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments