Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नाकाद्वारे शस्रक्रियेने ब्रेन ट्युमरवर अत्याधुनिक उपचारपद्धती !!


सोलारींज हॉस्पिटल न्युरोटिकल केअरच्या डॉ.अमित ऐवळेंचा अभिनंदनीय प्रयत्न...

हॉस्पिटलकडून न्यूरोलॉजी व मणक्याचे विकार ( स्पाईन )विषयक मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन...

       ब्लॅक अँड व्हाईट उल्हासनगर, प्रफुल केदारे 

डोकेदुखी आणि दृष्टी कमी होणे, हार्मोन्स मध्ये बदल होणे ही लक्षणे असतील तर दुर्लक्षित करू नका. कारण ती ब्रेन ट्यूमरची लक्षणे असू शकतात. डॉ. दीपक ऐवळे (न्यूरोलॉजिस्ट) आणि डॉ. अमित ऐवळे (न्यूरोसर्जन) यांनी स्थापन केलेल्या सोलारिस हॉस्पिटलमध्ये यावर नाकाद्वारे ब्रेनट्युमरची शस्रक्रिया उपचार पध्दती आता अत्यंत सोपी झाली आहे. 

उल्हासनगर येथील रहिवासी असलेले अनिल बोराडे (वय ५५), जे आधारवाडी कारागृहा मध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. तसेच अनिल सोनवणे (वय ३६), जे एका इन्शुरन्स कंपनीत टीम लीडर म्हणून आहेत. या दोघांनाही ठाणे येथील सोलारिस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमुळे “जीवनदान” मिळाले आहे. या याशिवाय, उल्हासनगर येथीलच जयदेव मुरपानी हे स्ट्रोकने पिडीत रुग्ण उपचारासाठी सोलारिस हॉस्पिटलमध्ये आले होते. या प्रक्रियेचा वापर करून ब्रेन ट्यूमरने ग्रस्त असलेल्या १०० हून अधिक रुग्णांचे प्राण वाचवले आहेत.

सोलारिस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातुन उल्हासनगरमधिल रेडक्रास हौस्पिटल येथे न्यूरोलॉजी आणि मणक्याच्या समस्यांसाठी मोफत शिबिराचे आयोजन करत आहे. ज्यांना मेंदू आणि मणक्याच्या गाठी, जुनाट डोकेदुखी, फेफरे, चक्कर, न्यूरोपॅथी, हालचाल आणि संतुलनाचे विकार, मायस्थेनिया ग्रेव्हिस इ. समस्या आहेत. हे शिबिर अनुसया चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंडियन रेड क्रॉस सोसायटी, उल्हासनगर यांच्या संयुक्त विद्यमाने न्यूरोलॉजी आणि मणक्याच्या समस्यांनी ग्रस्त रुग्णांसाठी २२ फेब्रुवारी, २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० या वेळेत होत आहे, यांचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती डॉ.अमित ऐवळें यांनी नागरिकांना केली आहे.

Post a Comment

0 Comments