Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

केडीएमसी संदर्भात कॉंग्रेसच्या नियुक्त्यांचे सर्व अधिकार प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांना

 

                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका संदर्भात कॉंग्रेसच्या सर्व पदांसाठी नियुक्तांचे अधिकार हे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांना देण्यात आले आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व प्रभारी  राजन भोसले यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश कॉंग्रेसचे ऑफिस टिळक भवन येथे पार पडलेल्या बैठकीत सर्वांच्या सहीने हा ठराव करण्यात आला

प्रदेश कॉंग्रेसचे ऑफिस टिळक भवन येथे नविन निवडून आलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगरसेविका कांचन कुलकर्णी व समीना शेख यांचा काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला. त्यावेळी प्रदेश सरचिटणीस एडवोकेट नविन सिंगसरचिटणीस ब्रिज दत्तजिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकरसुरेंद्र आढाववर्षा शिखरेराजेश तिवारीसलीम शेखयोगेश कुलकर्णी व अन्य कॉंग्रेस चे पदाधिकारी उपस्थित होते. सत्कार झाल्यानंतर राजन भोसले यांच्या दालनात निवडून आलेल्या नगरसेवक व प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष यांची बैठक झाली. त्या बैठकीत "कल्याण डोंबिवली महानगरपालिका संदर्भात सर्व पदांसाठी नेमणुका करण्याचे आधिकार प्रांताध्यक्ष  हर्षवर्धन सपकाळ यांना देण्यात आल्याचा ठराव सर्वांच्या सहीने करण्यात आला.


Post a Comment

0 Comments