Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

उल्हासनगर महानगरपालिकेत व सभागृहातही महिलांराज,


पहिल्यांदाच ७८ पैकी ४४ महिला नगरसेविका व आयुक्तांव्यतिरिक्त तीन महिला उपायुक्त
 
            ब्लॅक अँड व्हाईट उल्हासनगर,प्रफुल केदारे 

 महानगरपालिकेच्या १९९७ सालच्या स्थापनेनंतर तब्बल २९ वर्षानंतर पहिल्यांदा मनीषा आव्हाळे ह्या आयएएस महिला अधिकारी आयुक्तपदी विराजमान झालेल्या आहेत.त्यांच्यासोबत प्रतिनियुक्तीवरील तीन महिला उपायुक्त देखील आलेल्या असून स्थानिक महिला अधिकारीही विविध विभागाच्या प्रमुखपदावर आहेत.त्यातच चार वर्षानंतर झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत ७८ नगरसेवक निवडून आले असून त्यामध्ये महिला नगरसेविकांची संख्या हि ४४ असल्यामुळे उल्हासनगर महानगरपालिकेत आणि महासभा सभागृहातही महिलांचे बहुमत निर्माण झाले आहे.
निवडून आलेल्या ४४ नगरसेविकांपैकी काँग्रेस आणि वंचितच्या प्रत्येकी एक नगरसेविका असून उर्वरित ४२ नगरसेविकांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा नगरसेविकांचा समावेश आहे. पुरुष आणि महिलांसाठी प्रत्येकी ५० टक्यांचे समीकरण असताना ५ महिला नगरसेविका अतिरिक्त निवडून आल्याने महासभा सभागृहात महिला नगरसेविकांची संख्या अधिक प्रमाणात दिसणार आहे.

महानगरपालिका मुख्यालयात आयुक्त मनीषा आव्हाळे,मुख्यालय उपायुक्त डॉ.दिपाली चौगले,उपायुक्त विशाखा मोटघरे,उपायुक्त स्नेहा करपे,कर निर्धारक व संकलक निलम कदम,सिस्टीम एनालिस्ट श्रद्धा बाविस्कर,वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.मोहिनी धर्मा,सहायक आयुक्त सलोनी निवकर,अलका पवार,उद्यान व पर्यावरण विभागप्रमुख विशाखा सावंत,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रभारी अधीक्षक दिप्ती पवार,समग्र शिक्षा अभियानच्या समन्व्यक संगीता काळे,राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानच्या व्यवस्थापक संजीवनी अमृतसागर,मालमत्ता व्यवस्थापक छाया डांगळे ही महिला अधिकाऱ्यांची आणि विभागप्रमुखांची फळी कार्यरत आहे.त्यामुळे महानगरपालिकेत आणि सभागृहातही महिलांचे स्पष्ट बहुमत दिसू लागले आहे.

Post a Comment

0 Comments