Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याणातील कॅप्टन ओक हायस्कूलने राबविला निसर्गचित्रणाचा अनोखा उपक्रम


                    ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याणातील बालक मंदिर संस्थेच्या सुप्रसिद्ध अशा कॅप्टन रवींद्र माधव  हायस्कूलमध्ये दि.३फेब्रुवारी २०२६ रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी  निसर्गचित्रणाचा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निसर्गात जाऊन निसर्गचित्रण  करता यावे व त्यांच्यामध्ये कलेची आवड निर्माण व्हावी म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम शाळेतील सेवानिवृत्त कलाशिक्षक श्री. कैलास यादव सरोदे यांनी त्यांच्या संकल्पनेतून विद्यार्थी, शाळा व संस्थेवर  असलेल्या प्रेमापोटी राबविला. 

श्री. कैलास सरोदे हे सेवानिवृत्तीनंतरही शाळेत विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण व दर्जेदार उपक्रम राबवित आहेत.शाळेचे मुख्याध्यापक श्री. दिलीप सलाबत तडवी यांना  हा उपक्रम खूपच आवडला म्हणून त्यांनी हा उपक्रम शाळेत यशस्वीपणे राबविला. हा उपक्रम शाळेत इ. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आला. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.  कलाशिक्षक श्री. कैलास सरोदे सर,श्री.पांडुरंग भारती सर, बदलापूरच्या गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या कला शिक्षिका सौ. उर्मिला दुरगुडे व शाळेचा माजी विद्यार्थी कु. अक्षय गगे यांनी विद्यार्थ्यांना अगदी सहज सोप्या पद्धतीने निसर्गचित्रणाचे उत्कृष्ट असे प्रात्यक्षिक करून दाखविले. विद्यार्थ्यांना या प्रात्यक्षिकांचा छान उपयोग झाला आणि विद्यार्थ्यांनी अप्रतिम असे निसर्गचित्र तयार केले.

हा निसर्गचित्रणाचा उपक्रम कल्याणातील दुर्गाडी किल्ला परिसर व कल्याण खाडी परिसरात घेण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. दिलीप  सलाबत तडवी सर, पर्यवेक्षक श्री. पंढरीनाथ बाविस्कर व ज्येष्ठ शिक्षक श्री. उत्तम गायकवाड सर यावेळी विद्यार्थी  व  शिक्षकांचे कौतुक करण्यासाठी निसर्गचित्रणाच्या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते. 

या उपक्रमाला स्पर्धेचे रूप देण्यात आले असून पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या पारितोषिकासाठी सौजन्यही श्री. कैलास सरोदे सर यांचे असणार आहे. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक श्री. दिलीप तडवी सर, पर्यवेक्षक श्री. पंढरीनाथ बाविस्कर व ज्येष्ठ शिक्षक श्री. उत्तम गायकवाड सर यांचे विशेष सहकार्य लाभले. 

      

Post a Comment

0 Comments