Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

केडीएमसी महापौर पदासाठी शिवसेनेच्या वतीने हर्षाली चौधरी थविल यांचा उमेदवारी अर्ज दाखल तर उपमहापौर पदासाठी भाजपाच्या वतीने राहुल दामले यांनी दाखल केला अर्ज

                       ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

 कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीनंतर महापौर निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले असून महापौर पद अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले आहे. या महापौर पदासाठी शिवसेनेच्या  वतीने नगरसेविका हर्षाली चौधरी थविल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर उपमहापौर पदासाठी भाजपाच्या वतीने नगरसेवक राहुल दामले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांसाठी मंगळवारी 3 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे.


आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात पालिका सचिव किशोर शेळके यांच्याकडे हे दोन्ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदेआमदार राजेश मोरेमनसेचे माजी आमदार राजू पाटीलशिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरेभाजपाचे जिल्हा अध्यक्ष नंदू परबनरेंद्र सूर्यवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. मात्र दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकाच उमेदवाराचे अर्ज दाखल झाल्यानेया महत्त्वाच्या पदांवरील निवडणुकीचा निकाल जवळपास निश्चित झाला आहे. त्यामुळे येत्या ३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेतील निवडणूक प्रक्रिया ही केवळ औपचारिकता ठरणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागून असूननव्या महापौर आणि उपमहापौरांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाला आणखी गती मिळेलअसा विश्वास खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान ॲड.हर्षाली चौधरी थविल या प्रभाग क्र. 3 ब मधून निवडून आल्या असून त्या उच्चशिक्षित वकील आहेत. यंदाची त्यांची नगरसेवक पदाची दुसरी टर्म असून मागील नगरसेवक कारकिर्दीचा अनुभव आहे.  मुंबई हायकोर्ट येथे10 वर्षांपेक्षा अधिक वकिली अनुभव, नगरसेवक म्हणून स्थायी समिती सदस्यां म्हणून कामकाज केले आहे.

तर उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केलेले भाजपाचे जेष्ठ नगरसेवक राहुल दामले हे उच्चशिक्षित असून बांधकाम व्यावसायिक आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  सक्रिय सदस्य आहेत. राहुल दामले विधानसभा निवडणूक लढण्यासाठी दावेदार होते. २००५ साली स्विकृत नगरसेवक होते. २०१०२०१५ आणि २०२६ साली नगरसेवक पदी निवडून आले. २०१३ -१४ साली उपमहापौर पदी होते. २०१८ साली स्थायी समिती सभापती पदी होते. २०१९ साली विरोधी पक्ष नेते पदी होते. आत्ता पुन्हा त्यांच्या गळयात दुसऱ्यांदा उपमहपौर पदाची माळ पडली आहे.

केडीएमसी सार्वत्रिक निवडणूक 2026 मधून नवनर्वचित झालेल्या सदस्यांपैकी एकाची महापौरदुसऱ्या एकाची उपमहापौर म्हणून निवड करण्यासाठी विभगीय आयुक्त कोकण भवन यांनी जिल्हा अधिकारी मुंबई शहर अचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी विशेष सभा मंगळवार 3फेब्रुवारी 2026 रोजी १२.वा. आयोजित करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार महापौर पदासाठी उमेदवार हर्षाली चौधरी यांचे  तीन अर्ज तसेच उपमहापौर पदासाठी राहूल दामले यांचे दोन नामनिर्देशन पत्र अर्ज प्राप्त झाले आहेत. निवडणूक प्रक्रियाच्या सुरूवातीला अर्ज मागे घेण्यासाठी  १५ मिनिटाचा कालावधी दिला जाईल. अर्ज मागे न घेतल्यास बिनविरोध निवड केली जाणार असल्याचे केडीएमसी सचिव  शेळके यांनी प्रसिध्दी माध्यामांना सामारे जाता सांगितले.


Post a Comment

0 Comments