Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

ग्रामीण ते शहरी नागरिकांपर्यंत सायबर सुरक्षेचा संदेश “आजची जागरूकता, उद्याची सुरक्षा!”

                    ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

बी. के. बिर्ला नाईट कॉलेजकल्याण येथील सायबर दृष्टी सेल यांच्या विद्यमाने नागरिकांमध्ये डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचा उद्देश नागरिकांना युपिआय व नेट बँकिंगचा सुरक्षित वापरओटीपी व लिंक फ्रॉडपासून संरक्षणबनावट कॉल-मेसेज ओळखणेसोशल मीडिया सुरक्षिततापासवर्ड संरक्षण तसेच चाटजीपीटी सारख्या एआय साधनांचा योग्य वापर याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन देणे हा आहे.


या डिजिटल साक्षरता प्रवासाची सुरुवात एनएसएस शिबिरांतर्गत रुंदे व अंबिवली गावात करण्यात आली. या ठिकाणी शालेय विद्यार्थीमहिला व ज्येष्ठ नागरिकांना प्रत्यक्ष मोबाईल वापरून युपिआय सेट-अपफसव्या लिंक कशा ओळखायच्याकॉल फ्रॉडची उदाहरणेसायबर फसवणूक झाल्यास कुठे व कशी तक्रार करावीतसेच फोन हरवल्यास घ्यावयाची तात्काळ पावले याची माहिती देण्यात आली.

यानंतर काळा तलावकल्याण (पश्चिम) येथे सकाळी दोन सत्रांमध्ये सायबर जागरूकता उपक्रम राबविण्यात आला. येथे नागरिकांशी थेट संवाद साधत क्यूआर कोड स्कॅम, ओटीपी शेअरिंगचे धोकेसोशल मीडिया हॅकिंगपासून संरक्षणसुरक्षित पासवर्ड तयार करण्याच्या पद्धती तसेच चाटजीपीटी सारख्या आधुनिक एआय साधनांचा शैक्षणिक व दैनंदिन जीवनातील उपयोग सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आला.

पुढील टप्प्यात डी मार्टवसंत व्हॅलीखडकपाडा तसेच राणी लक्ष्मीबाई उद्यानसिंडिकेट परिसरात नागरिकांसाठी सायबर जागरूकता सत्रांचे आयोजन करण्यात आले. बाजारपेठ व सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना युपीआय व्यवहार करताना आवश्यक खबरदारीबनावट अ‍ॅप्स व लिंक ओळखणेफोन हरवल्यास घ्यावयाची तात्काळ पावलेतसेच “सायबर सेफ्टीच्या सात सवयी” प्रत्यक्ष उदाहरणांसह समजावून सांगण्यात आल्या.

 

 

या सर्व उपक्रमांदरम्यान सायबर दृष्टी सेलच्या टीमने लाईव्ह डेमोप्रश्नोत्तर सत्रप्रत्यक्ष केस-स्टडी उदाहरणे आणि वैयक्तिक मार्गदर्शन देत नागरिकांशी थेट संवाद साधला. त्यामुळे नागरिकांना केवळ माहितीच नव्हे तर प्रत्यक्ष वापरात येणारे उपाय मिळाले. या मोहिमेचे नेतृत्व विद्यार्थी समन्वयक लक्ष्मी सिंह व प्रसाद जावळे यांनी केले. मुख्य कार्यसंघात दिव्या नायरप्राची चौहानयशराज गायकवाडमुरतझा सेवकवेदांग सगभोरवेदिका केणीसेजल भिलारेप्रांशू मिश्राअथर्व जाधवसुभश्री पाधीआदित्य मिश्रा तसेच इतर विद्यार्थ्यांनी विशेष योगदान दिले.

या उपक्रमांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बिपिनचंद्र वडेकर व शिक्षक समन्वयक डॉ. रुपेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी डिजिटल सुरक्षितता ही आजच्या काळाची गरज असल्याचे नमूद करत विद्यार्थ्यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. या मोहिमेमुळे अनेक नागरिकांमध्ये डिजिटल व्यवहारांबाबत आत्मविश्वास निर्माण झाला असून सायबर फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक सजगता वाढल्याचे सहभागी नागरिकांनी सांगितले.

भविष्यात सायबर दृष्टी सेलकडून ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असून पुढील टप्प्यात पोलीस स्टेशनउल्हासनगरवसिंदआसनगावकेडीएमसी परिसरहिवरे बाजारटिटवाळा मंदिर परिसरशहरी वसाहती तसेच ग्रामीण समुदायांमध्ये डिजिटल साक्षरता व सायबर जागरूकतेचे उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम म्हणजे नागरिकांना डिजिटल जगात सुरक्षितसजग आणि आत्मनिर्भर बनविण्याचा प्रभावी सामाजिक प्रवास असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


Post a Comment

0 Comments