Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

श्री कल्पेश मनोहर शिंदे यांची RSP अधिकारी म्हणून नियुक्ती

                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

पदमश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नति मंडळ भिवंडी संचलित तळेगाव विभाग हायस्कूल तळेगाव ता मुरबाड या विद्यालयाचे शिक्षक समुपदेशक आणि बिलघर गावचे सुपुत्र श्री कल्पेश मनोहर शिंदे यांची पोलीस आयुक्तालय ठाणे यांच्या आदेशानुसार RSP अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.शाळाशाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये आत्मरक्षा, जनसेवा, देशभक्तीची भावना वाढवण्यासाठी, विद्यार्थ्यांमध्ये शिस्तबद्ध रीतीने राष्ट्रसेवेची इच्छा निर्माण करण्यासाठी, सामाजिक आणि सार्वजनिक सेवा कार्य करण्याचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी, कोणत्याही संकटाच्या वेळी देशाचे व स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम बनवण्यासाठी, विद्यार्थी व महाराष्ट्र पोलीस यांच्यातील दुवा म्हणजे RSP(Road Safety Petrol)रस्ता सुरक्षा दलात ठाणे पोलीस आयुक्तालय  अंतर्गत वाहतूक पोलीस उपआयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आर एस पी अधिकारी महाराष्ट्र राज्य म्हणून त्यांची नियुक्ती करून त्यांना RSP आणि CIVIL DEFENCE चे प्रशिक्षण व वर्दी देऊन सन्माननीय पोलीस उपआयुक्त मा श्री. पंकज शिरसाठ साहेब यांच्या शुभहस्ते शुक्रवार दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी सन्मानित करण्यात आले.

सरांची RSP अधिकारी महाराष्ट्र राज्य म्हणून निवड झाल्याबद्दल सरांचे शालेय सल्लागार समितीचे चेअरमन श्री अरुणबंधू चौधरी,सदस्य श्री दीपक देशमुख,श्री श्रीकांत देशमुख आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वसंत महाले सर,सौ फुलपगारे मॅडम,शिक्षक प्रतिनिधी श्री मंगल कोळी सर,जयश्री मॅडम, अक्षय ठाकरे सर, सेवक पंढरीनाथ देशमुख सर्व शिक्षक,सर्व पालक,सर्व विद्यार्थी,तळेगाव व बिलघर पंचक्रोशीतील पालकवर्ग यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. श्री कल्पेश शिंदे सर यांनी आपल्या पदमश्री संस्थेच्या व तळेगाव शाळेच्या, बिलघर गावच्या इतिहासात मानाचा तुरा रोवल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे. आणि सरांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या

Post a Comment

0 Comments