Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

जीवन रेखा फाउंडेशनच्या अध्यक्षा रेखा राहुल मोरे यांना जीवन गौरव पुरस्कार

                      ब्लॅक अँड व्हाईट ठाणे वार्ताहर 

 कल्याण शहरातील कचोरे गाव येथील जीवन रेखा फाउंडेशनच्या अध्यक्षा रेखा राहुल मोरे यांना सहा जानेवारी 2026 रोजी पत्रकार दिनाच्या निमित्ताने जीवन गौरव पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते 

ठाण्यातील अग्रगण्य  ठाणे नवादूत  या वृत्तपत्राच्या माध्यमातून  दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येत असते.त्याच अनुषंगाने सार्वजनिक वाचनालय  येथे हा सन्मान सोहळा संपन्न झाला.

 जीवन रेखा फाउंडेशनच्या माध्यमातून रेखा राहुल मोरे यांनी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध सामाजिक उपक्रम राबवून आपल्या कार्याची दाखल घेण्यास भाग पाडल्याचे. मुरबाड तालुक्यातील वाकलवाडी उंबरवाडी येथील आदिवासींना रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून मार्गदर्शन शिबिर, तसेच कल्याण येथे महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून विविध उपक्रम जीवनरेखा च्या माध्यमातून रेखा मोरे यांनी राबवले आहेत. सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने भव्य स्वच्छता अभियाना  सारखे अनेक उपक्रम राबविले जातात. 

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सामाजिक समस्यांना संस्थेच्या माध्यमातून वाचा फोडून अनेक समस्या सोडवण्यासाठी रेखा मोरे यांनी पुढाकार घेतलेला आहे आकाशवाणी मुंबई केंद्राने देखील त्यांच्या कार्याची दखल घेऊन सुगरण या सगळ्यांमध्ये कामगार सभेमध्ये त्यांची मुलाखत घेतली होती अशाप्रकारे कार्य करणाऱ्या रेखा मोरे यांना पत्रकार देणे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा  वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments