ब्लॅक अँड व्हाईट मुंबई वार्ताहर
विदर्भ माळी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त जीवनपट आणि समाज प्रबोधन व्याख्यान कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमात प्रेरक व्याख्याते आणि चित्रकार "श्री.आनंदकिशोर कृष्णराव मेहर" यांनी ज्ञानगंगोत्री सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे मुद्दे तुलनात्मक पद्धतीने आपल्या प्रेरक शैलीतून समाज बांधवांसमोर प्रभावीपणे मांडले.त्यामुळे 195वर्षांपुर्वीची भयानक परिस्थिती आणि क्रांतिज्योती यांनी सोसलेली दाहकता नजरेसमोर ऊभी राहीली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपदी मा. रामराव निमकंडे साहेब आणि कार्याध्यक्षा पूनम धीरज तायडे मॅडम होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून श्री सूर्यकांत थोरात आणि विदर्भ माळी संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. प्रकाशजी ढोकणे, श्री नामदेवराव बगाडे, श्री देविदासजी रहाटे, एडोकेट प्रभाकर राऊत, उपस्थित होते.या कार्यक्रमात स्त्रीयांचा सन्मान आणि समाज विकास या विषयावर कु. मोनिका काळे यांनी प्रबोधन केले. समाजभूषण पुरस्कार मा. एडवोकेट संजय माळी साहेब यांना प्रदान करण्यात आला.
प्रेरक वक्ते आणि चित्रकार "श्री आनंदकिशोर कृष्णराव मेहर" हे स्वतः कल्याण ते मुंबई या क्षेत्रात प्राॅपर्टी रिअल इस्टेटचा व्यवसाय करतातच.त्याच बरोबर समाजिक बांधीलकी या नात्याने त्यांनी आपल्या प्रबोधन पर व्याख्यानात समाज बांधवांसाठी विनामूल्य मार्गदर्शनासाठी संपर्क साधावा असे आवाहन केले.
जसे व्यावसाय मार्गदर्शन, शिक्षक, विद्यार्थी पालक यांना मार्गदर्शन, करिअर मार्गदर्शन, अभिनय कार्यशाळा, गर्भसंस्कार, समुपदेशन , प्राॅपर्टी खरेदी-विक्री मार्गदर्शन, विविध साॅप्टस्किल्स , व्यक्तीमत्व विकास आणि चित्रकला कार्यशाळा आयोजित करण्यासाठी संपर्क साधावा - 9320265626 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अश्विनी राहटे, सौ. अन्नपूर्णा इंगळे आणि शैलेश वासनकर यांनी केले. कार्यक्रमामध्ये माळी कौटुंबिक स्नेहसंमेलन व महिलांसाठी हळदी कुंकू समारंभही आयोजित करण्यात आला होता.
संस्थेचे अध्यक्ष मा.प्रभाकर सातव, सचिव मा.श्री.धैर्यशील भोपळे, एडोकेट अविनाश गवळी, श्री संतोष भाड, श्री योगेश इंगळे, श्री ज्ञानेश्वर धाडसे आणि समस्त कार्यकारीणी यांच्या सहकार्याने नियोजनबद्ध कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
.jpg)


Post a Comment
0 Comments