ब्लॅक अँड व्हाईट मुंबई प्रतिनिधी
‘आर्ट व्हिजन’ आयोजित १४वे भव्य कला प्रदर्शन नेहरू सेंटर सर्क्युलर आर्ट गॅलरी, वरळी येथे उत्साहात सुरू झाले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन पारंपरिक दीपप्रज्वलनाने करण्यात आले. हे प्रदर्शन ३० डिसेंबर २०२५ ते ५ जानेवारी २०२६ या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत रसिकांसाठी खुले राहणार आहे.
उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्या अल्फिया नटावाला (संस्थापक – बाकिन आर्ट मटेरियल्स) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी अनेक ज्येष्ठ कलाकार, आयोजक व कला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रदर्शनात निसर्गचित्रे, ग्रामीण जीवन, व्यक्तिरेखा, अमूर्त कला तसेच पारंपरिक भारतीय नृत्य व संस्कृतीवर आधारित चित्रकृती पाहायला मिळत आहेत. वॉटरकलर, अॅक्रेलिक व मिश्र माध्यमांतील कलाकृतींमधून कलाकारांची कल्पकता ठळकपणे दिसून येते.
या प्रदर्शनाचे समन्वयक "आनंदकिशोर कृ.मेहर" (कलाकार व प्रेरणादायी वक्ते) असून, आर्ट व्हिजनच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना व्यासपीठ देण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
नेहरू सेंटर सर्क्युलर आर्ट गॅलरी, वरळी येथे ‘आर्ट व्हिजन’च्या १४व्या कला प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्या अल्फिया नटावाला यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करताना आयोजक व कलाकार.कार्यक्रमाला रघुनाथ पोवळे (मार्केटिंग सल्लागार ),संजय धमापूरकर (प्रसिद्धी प्रमुख ),महादेव गोपाळे (जेष्ठ चित्रकार /रांगोळी आर्टिस्ट )कलरसिक विशेष उपस्तीत होते.
कार्यक्रम: १४वे कला प्रदर्शन,..आयोजक: आर्ट व्हिजन कालावधी: ३० डिसेंबर २०२५ ते ५ जानेवारी २०२६
वेळ: सकाळी ११ ते सायंकाळी ७...स्थळ:नेहरू सेंटर सर्क्युलर आर्ट गॅलरी (भूतल),डिस्कव्हरी ऑफ इंडिया इमारत,डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई सहभागी कलाकार: अर्जुन मचिवाले | महेश कदम | रियाज काझी | रोशन गोताड, अरबाज उस्मान.
.jpg)


Post a Comment
0 Comments