Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

निवडणूक जनजागृतीसाठी केडीएमसीतर्फे विविध स्वीप उपक्रमांचे आयोजन

           

                   ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या जनजागृतीसाठी महानगरपालिकेने अनेक स्वीप उपक्रमांचे आयोजन महापालिका परिक्षेत्रात केले आहे. जनमानसात मतदानाबाबत अधिकाधिक जनजागृती व्हावी या दृष्टीकोनातून कल्याण पश्चिम येथील नागरिकांचा जास्त वावर असलेल्या  सिटी पार्क मध्ये विविध ठिकाणी तसेच वसार, भाल बस थांबा परिसरचक्कीनाका परिसर येथे जे.सी.एस मराठी हायस्कुलप्रगती विदयामंदिर प्राथमिक शाळा यांच्या विदयार्थ्यांमार्फत जनजागृतीपर पथनाटयांचे आयोजन करण्यात आले.

 
 

यावेळी कल्याण डोंबिवली महागनरपालिकेचे स्वीपचे नोडल अधिकारी संजय जाधवसहा.नोडल अधिकारी विजय सरकटेजे.सी.एस शाळेचे मुख्याध्यापक गणेश कोळेकर व प्रगती विदयामंदिर प्राथमिकचे मुख्याध्यापक संतोष माने तसेच इतर सह शिक्षक उपस्थित होते.  तर महापालिकेच्या विविध शाळांमध्ये आकर्षक रंग रांगोळीच्या माध्यमातूनफुलांच्या माध्यमातून तसेच हातांवर रेखाटलेल्या मेंदीच्या माध्यमातून अनोख्या पध्दतीने मतदानाची  जनजागृती करण्यात आली.


Post a Comment

0 Comments