कल्याण-डोंबिवलीत महायुतीतील 55 ते 60 जणांची तयार करण्यात आली यादी
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण-डोंबिवलीत महायुतीतील शिवसेना शिंदे गट-भाजप एकत्र निवडणूक लढत आहेत. निवडणुकीत अनेक जण इच्छुक होते. त्यामध्ये बहुतांश इच्छूकांना शिवसेना भाजपा नेत्यांनी अर्ज मागे घ्यायला लावला. परंतु अद्याप काही बंडखोर आहेत. त्यांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली नाही. त्यासोबतच असेही काही लोक आहेत जे पक्षात राहून पक्षविरोधी काम करीत आहेत अशा लोकांची एक यादी तयार करून शिवसेना-भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पाठवण्यात आली आहे. काही तासात त्यांच्यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल असे विधान शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी केले आहे. शिवसेना भाजपामध्ये कल्याण डोंबिवलीत 55 ते 60 लोक असे आहेत जे बंडखोरी करून निवडणूक लढत आहे आणि यातील काही लोक पक्षात राहून पक्षविरोधी काम करत आहेत. यामुळे बंडखोरी आणि पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर दोन्ही पक्ष कडक कारवाई करणार हे निश्चित मानले जात आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments