ब्लॅक अँड व्हाईट (विद्या कुलकर्णी)डोंबिवली
दि. ३ जानेवारी २०२६, शनिवार, रोजी शिवाई बालक मंदिर शाळेत वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.या पारितोषिक सोहळ्यासाठी मा.विद्या दीपक कुलकर्णी,मा.भारती गोखले आणि माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा.मिताली इनामदार , तसेच सहावी ते दहावी सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.लेझीमच्या गजरात पाहुण्यांचे स्वागत केले गेले. त्यानंतर दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. दीपप्रज्वलनाच्या वेळी शर्वरी दाबके मॅडम यांनी सरस्वती स्तवन सादर केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिताली इनामदार यांनी केले .
आज सावित्रीबाई फुले जयंती यानिमित्ताने कुमारी हर्षदा मते (इ. ९वी ब) हिने सावित्रीबाईंच्या वेशभूषेत त्यांचे स्वगत सादर केले. मा.विद्या कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .मार्गदर्शनात त्यांनी सावित्रीबाई फुले, यांसारख्या समाज सुधारकांचे चरित्रे, ग्रंथ मुलांनी वाचले पाहिजेत वाचनावर भर दिला गेला पाहिजे असे सांगितले. आपल्या आयुष्यात आपले आई ,वडील, गुरुजन आणि शाळा यांचा फार मोठा वाटा आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांना असली पाहिजे तसेच कोणतीही गोष्ट केवळ स्वप्न पाहून होत नाही तर त्याला कष्टाची, मेहनतीची जोड निश्चितच गरजेची असते असेही त्यांनी सांगितले. आपले उद्दिष्ट ठरवून दिशा निश्चित करणे गरजेचे आहे. आपले प्राधान्य कशास द्यायला हवे हेही ठरवता आले पाहिजे असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले तसेच आपल्या शाळेतीलउपक्रमाबद्दल त्यांनी कौतुक केले. विशेषतः सिंदूर ऑपरेशन यासारख्या उपक्रमांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला त्याबद्दल शाळेचे व शिक्षकांचे उपक्रम राबवल्याबद्दल कौतुक केले. नीट ऐकणे, नीट बोलणे व इतरांचा आदर करणे या सवयी विद्यार्थ्यांनी अंगी रुजवायला हव्यात असे अतिशय मोलाचे मार्गदर्शन मा.विद्या मॅडम यांनी विद्यार्थ्यांना केले.
आजच्या दुसऱ्या प्रमुख पाहुण्या मा.भारती गोखले यांनी विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकाचे वाचन केले पाहिजे .आपला अभ्यास करताना तो विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने केला पाहिजे, तसेच अभ्यास करण्याची जाणीव विद्यार्थ्यांना स्वतःहून असली पाहिजे, दिखाऊपणासाठी अभ्यास करू नये. सकस आहार, पुरेशी विश्रांती, व्यायाम, आपला छंद या सगळ्यांच्या नियोजनाने अभ्यास केला पाहिजे. नुसता अभ्यास न करता आपला छंद जोपासणे, मैदानी खेळ खेळणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे असे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

यानंतर संपूर्ण वर्षभरात घेतल्या गेलेल्या उपक्रमांची, शैक्षणिक तसेच क्रीडा महोत्सवाची बक्षिसे मान्यवरांच्या,शिक्षकांच्या व पालकांच्या हस्ते देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभांडिक यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भोसले मॅडम यांनी केले. शर्वरी दाबके यांच्या सुमधुर आवाजात पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
.jpg)






Post a Comment
0 Comments