ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
बालक मंदिर संस्था, कल्याण यांच्या वतीने कै. इंदूताई देवधर व कै. वा. शि. आपटे स्मृती प्रित्यर्थ वक्तृत्व स्पर्धा रविवारी संस्थेच्या हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात सुरू झाली. या वर्षी या स्पर्धेचे २१ वे वर्ष होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालक मंदिर संस्थेचे विश्वस्त व. द. काणे हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. संभाजी राजाराम शेळके (प्राध्यापक, व्याख्याता व इतिहास अभ्यासक) यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच यावेळी संस्थेच्या तृप्ती माळीचकर या देखील उपस्थित होत्या.
संस्थेचे कार्याध्यक्ष मयुरेश गद्रे यांनी कार्यक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच संस्थेच्या विश्वस्त व स्पर्धा प्रमुख तेजस्विनी पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे यशस्वी नियोजन करण्यात आले. समिती प्रमुख शिंदे व तृप्ती गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तसेच समितीतील सर्व शिक्षकांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या वक्तृत्व स्पर्धेत विविध शाळांमधून आलेल्या एकूण २२० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी सामाजिक, शैक्षणिक व समकालीन विषयांवर प्रभावीपणे आपले विचार मांडले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाचे विशेष कौतुक केले.
याच उपक्रमांतर्गत कै. क. ह. देशपांडे स्मृती प्रित्यर्थ ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांसाठी निबंध स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. शिक्षकांनी या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत विचारप्रवर्तक लेखन सादर केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलास लिखार, जितेंद्र निकुंभ, शशिकांत गवारे, प्रकाश पानसरे व इतर सहकारी यांची मोलाची मदत झाली. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सुत्रसंचलन व आभाराचे काम कॅप्टन ओक हायस्कूलच्या मनीषा जाधव यांनी केले.
.jpg)


Post a Comment
0 Comments