Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नवगाव वन विभाग जागेतील सीमारेषा पिलर बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

 

संयुक्त वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष

दिलीप टेंभे यांचा खळबळजनक आरोप

                   ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

 नवगाव येथील वनविभागाच्या जागेत कल्याण वनविभागाच्या वतीने सीमा रेषेचे बांधकाम सुरू आहे. परंतु ते बांधकाम निकूष्ट दर्जाचे असल्याचा सनसनाटी आरोप संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलिप टेंभे यांनी केला असल्याने  सीमारेषा पिलरचे बांधकाम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

       कल्याण वनविभागाच्या वतीने नवगाव येथील वनविभागाच्या जागेत सीमारेषा साठी पिल्लर चे बांधकाम सुरू आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समिती  समिती नवगावचे अध्यक्ष दिलीप टेंबे हे जंगलामध्ये गस्त घालत असताना त्यांना वन विभागाकडून वनविभागाच्या सीमारेषेवर पिलरचे बांधकाम चालू असल्याचे आढळून आले. परंतु त्या पिलरमध्ये आत जंगलातील दगड टाकून व त्याच्यावर ग्रीट पावडरचा लेप लावून निकृष्ट दर्जाचे काम चालू असताना संयुक्त वनविभाग समितीचे  नवगावचे अध्यक्ष दिलीप टेंबे यांनी सदर पिलर फोडून पाहणी केले असता त्यात नुसते दगड टाकून ग्रीट पावडरचा लेप लावून शासनाचा निधी हडप करण्याच्या हेतूने ठेकेदार व वन विभाग अधिकाऱ्यांनी संगनमत करून शासनाचा निधी हडप करण्याचा उद्दिष्टाने निकृष्ट दर्जाचे काम केले आहे असे येथील वनविभागाचे अध्यक्ष दिलीप टेंबे यांचे म्हणणे आहे.

या कामाची विभागीय चौकशी होऊन ठेकेदार व वनक्षेत्रपालतसेच वनविभाग संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच यासंदर्भात लवकरच वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेणार असल्याचे टेंभे यांनी  यानिमित्ताने सांगितले.

 "यासंदर्भात कल्याण वन अधिकारी निलेश आखाडे यांच्याशी संपर्क साधला असतानवगाव वनविभागाच्या जागेत सुरू असलेल्या सीमारेषा पिलर बांधकामाची तातडीने पाहणी करण्यास सांगितले असून दर्जेदार काम होईल होण्यासंदर्भात सूचना केल्या  असल्याचे सांगितले."


Post a Comment

0 Comments