प्रजासत्ताकदीनी पोलीस निरिक्षक दादासो एडके यांच्या हस्ते भुवन शाळेच्या खेळाडूंचा गौरव!
ब्लॅक अँड व्हाईट ( मुरबाड ) - दिलीप पवार
जिल्हा स्तरावर लंगडी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्या बद्दल जि. प. भुवन शाळेच्या खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
आज ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या सर्व विद्यार्थ्यांवर ग्रामस्थांकडून व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुरबाड कडून विशेष भेटवस्तू,ड्रेस, शैक्षणिक साहित्य, गौरवचिन्ह देऊन विशेष कौतुक करण्यात आले.

हा कौतुक सोहळा मुरबाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक दादासो एडके, प्रसिद्ध समाजसेवक व दानशूर व्यक्तिमत्व मेहबूबभाई पैठणकर, गटशिक्षणाधिकारी मधुकर घोरड, रघुनाथ बांगर यांच्या शुभहस्ते पार पडला.


प्रथमच जिल्हा परिषद भुवन शाळेच्या खेळाडूंना जिल्हा स्तरावर प्रथम बक्षीस भेटल्यामुळे सर्व ग्रामस्थांना व शिक्षकांना अत्यानंद झाला आहे.विजेत्या संघाचे ढोलताश्याच्या गजरात मिरवणूक काढून ग्रामस्थांनी स्वागतही करण्यात आले. आज प्रजासत्ताक दीनाचे औचित्य साधून सर्व ग्रामस्थांनी या खेळाडूंचे गोड कौतुक करत, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत शैक्षणिक साहित्याची भेट दिली आहे.तसेच यामध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतिनेही दप्तर, वह्या, ट्रॉफी देऊन या मुलींना प्रोत्साहन देण्यात आले.यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून पोलीस निरिक्षक दादासो एडके यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे, दररोज होणारे अपघात या विषयी मार्गदर्शन करून शाळेचे शिक्षक व खेळाडूंना पुढील भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 
या कार्यक्रमासाठी पोलीस निरिक्षक दादासाहेब एडके, गटशिक्षणाधिकारी मधुकर घोरड, समाजसेवक मेहबूबभाई पैठणकर, सरपंच भुमिका बांगर,उपसरपंच सुनिल बांगर, माजी सरपंच रघुनाथ बांगर,दर्शना बांगर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप बांगर,ग्रामसेविका सौ. सिंघासने, रिपाईचे दिनेश उघडे, अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे अण्णा साळवे, लोकक्रांतीचे नरेश मोरे, रमेश देसले, जितेंद्र पंडित,सुधाकर शेळके, पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष शंकर करडे, तालुका अध्यक्ष दिलीप पवार, सचिव संजय बोरगे, संतोष राऊत,मिडियासेलचे चेतन पोतदार शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpg)

Post a Comment
0 Comments