Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

रिजन्सी अनंतम् लावण्यवती महिला मंडळातर्फे हळदी कुंकू समारंभाचे आयोजन

           ब्लॅक अँड व्हाईट.डोंबिवली ( विद्या कुलकर्णी )  

    दरवर्षीप्रमाणे रिजेंसी अनंतम् लावण्यवती महिला मंडळातर्फे हळदीकुंकू व तिळगूळ समारंभ प्रेमाने आणि आपुलकीने साजरा करण्यात आला.


आपल्या दैनंदिन जीवनात मोलाची भूमिका निभावणाऱ्या रिजेंसी अनंतम् संकुलातील साफसफाई कर्मचारी आणि घरकाम करणाऱ्या महिलांना या कार्यक्रमातून छोटासा मान-सन्मान आणि माणुसकीची ऊब देण्यात आली. त्यांना मोफत वाण व नाश्त्या वाटप करण्यात आले. १७५ ते २०० महिलांनी या मोफत उपक्रमाचा लाभ घेतला. त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं आनंद हेच या कार्यक्रमाचं खरं यश ठरलं.




हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या अध्यक्षा सोनाली विनित संदानशिव, सचिव हर्षदा पाठक, माजी मुख्याध्यापिका व पत्रकार विद्या कुलकर्णी मॅडम, स्वाती शिरवाडकर आणि गौरी देशपांडेयांनी घेतलेली मेहनत, जिव्हाळा आणि एकत्रितपणा खरोखरच मनापासून कौतुकास्पद आहे.

Post a Comment

0 Comments