Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मानपाडा पोलीसांनी हस्तगत केला गावठी कट्टा आणि २ जिवंत काडतुसं

                 

                    ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

मानपाडा पोलीस स्टेशनचे गस्ती पथक मानपाडा पोलीस ठाण्याच्या हददीत पेट्रोलींग करत असताना अडीवली पिसवली येथील यासीन जमील खान या इसमाकडे गावठी कट्टा असल्याची माहीत मिळाल्याने सपोनि संपत फडोळ व तपास पथकाचे अंमलदार यांनी त्यास शिताफिने ताब्यात घेतले असता त्याच्या ताब्यात एक गावठी बनावटीचा कटटा व २ जिवंत काडतुस मिळुन आले.

यासीन जमील खानवय ३० वर्षे असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्याकडून 10 हजार रुपये किमतीचा क देशी बनावटीचा लोखंडी गावठी कटटा व ४०० रुपये किमतीचे 2 जिवंत काडतुस असा एकूण 10 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हि कामगिरी पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे, सहा पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मागर्दशनाखाली वपोनि संदीपान शिंदेसपोनि संपत फडोळ, सपोउनि  पवारपोहवा मासाळपाटीलपोशि आहेरआव्हाडशेळके यांनी केली आहे.


Post a Comment

0 Comments