Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण- आंबिवलीतील इराणी चोरट्यांचे चोरीचे मार्ग उघड ; 30लाख 06 हजार 750 रुपये किमतीचे मालमत्ता जप्त

             ब्लॅक अँड व्हाईट मोहने(गीता गायकर/ऐनकर)

गेल्या दोन वर्षापासून कल्याणनजीक असलेल्या आंबिवलीतील इराणी वस्तीत भामट्यांनी  कल्याणसह ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर मुंबई,नवी मुंबई आणि थेट कर्नाटक राज्यात चोरीसाठी प्रवेश केला.इराणी चोरट्यांचे चोरीचे मार्ग आज पर्यंत पोलिसांनाही चक्रावून टाकतात.नुकताच इराणी वस्तीत मुंबईतील पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती.आता मात्र या भामट्यांचा धुमाकूळ वाढल्याचे लक्षात येत आहे.बतावणी आणि जबरदस्तीत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोनसाखळ्या लंपास करणाऱ्या सराईत इराणी चोरट्यांना ठाणे शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. कल्याण-आंबिवली येथील कासिम गरिबशहा इराणी (38) आणि मुख्तार शेरू हुसेन उर्फ इराणी (32) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ठाणे शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटनांचा समांतर तपास सुरू असताना, पोलीस अमलदार प्रशांत वानखेडे व विनोद चुने यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या पथकाने कासिम व मुख्तार यांना ताब्यात घेतले.

कोळसेवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 309(4) व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली. चौकशीत ठाणे, मुंबई, नवी मुंबई, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, ठाणे ग्रामीण परिसर तसेच कर्नाटक राज्यात त्यांनी केलेले 52 गुन्हे उघडकीस आले. आरोपींच्या ताब्यातून 30लाख 06 हजार 750 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. दोन्ही आरोपींना काही दिवसांसाठी पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील करत आहेत.

कासिमवर २०, मुख्तारवर १४ गुन्हे

कासिम गरिबशहा इराणी याच्यावर ठाणे, नवी मुंबई, पुणे, अहमदनगर, अकोला व रायगड येथे एकूण २० गुन्हे दाखल आहेत. तर मुख्तार शेरू हुसेन उर्फ इराणी याच्यावर ठाणे शहर पोलिस आयुक्तालयातील कोळसेवाडी, मानपाडा, एमएफसी, नौपाडा, कळवा, वर्तकनगर व मुंब्रा या पोलीस ठाण्यांत १४ गुन्ह्यांची नोंद आहे. 

इराणी चोरट्यांचे चोरीचे मार्ग

1.महिला गुंगी आणणारी वस्तू दाखवणे(चार लाख ४० हजार रूपयाहून अधिक किमतीची मेफेड्राॅन (एम. डी.) ही आरोग्याला घातक असणारी गुंगी आणणारी पावडर जप्त केली

2. सोनसाखळ्या किंवा आपल्याकडील माल महिलांनी किंवा पुरुषांनी दिला नाही तर त्यांना जबरदस्त मारण्याची धमकी देणे

Post a Comment

0 Comments