ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
डोंबिवलीत बिनविरोध काही उमेदवार निवडणून आले यातच आता प्रभाग 29 मध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे. त्यामुळे युती धर्म पाळला न गेल्याची चर्चा होती. पण या प्रभागात मैत्रीपूर्वक लढत होणार आहे, असे भाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब यांनी सांगत, या ठिकाणी 100% अंबरनाथ पॅटन राबवला जाईल असे सांगत थेट इशारा नंदू परब दिल्याचे बोलले जात आहे. दरम्यान यावेळी भाजपच्या उमेदवार कविता म्हात्रे, अलका म्हात्रे आणि आयरे गावातील रहिवासी संतोष केणे उपस्थित होते.
कल्याण डोंबिवलीत निवडणुकीचे वातावरण आता तापू लागले असून कल्याण डोंबिवली मधील काही लक्षवेधी लढत पैकी या पॅनल क्रमांक 29 मध्ये लक्षवेधी कारण शिवसेना विरुद्ध भाजपा अशीनिवडणूक होणार आहे.
दरम्यान रविवारीडोंबिवली आयरे गावात भाजप माजी नगरसेवक आणि आताचे उमेदवार मंदार टावरे यांनी आपल्या निवडणूक कार्यलयाचे उद्घाटन भाजप कल्याण जिल्हाअध्यक्ष नंदू परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी टावरे यांनी शक्ती प्रदर्शन करत शिवसेनेच्या उमेद्वारानावर घराणेशाही आरोप केला. तरं भाजप जिल्हा अध्यक्ष यांनी थेट पॅनल मध्ये अंबरनाथ पॅटर्न चालणार असे सांगितले.
दरम्यान प्रभाग 29 मधून शिवसेनेकडून रुपाली म्हात्रे, रंजना पाटील, नितीन पाटील आणि रवींद्र पाटील यांना उमेदवारी आहेतर भाजपने कविता म्हात्रे, आर्या नाटेकर, अलका म्हात्रे आणि मंदार टावरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होणार आहे. दरम्यान या पॅनल मध्ये काय होते हें पहावे लागेल.सगळीकडे युती झाली असताना या प्रभागामध्ये हट्टामुळे युती झाली नाही. ज्यावेळी आमचे उमेदवार फॉर्म भरायला गेले तेव्हा, शिवसेनेचे चारही उमेदवार फॉर्म भरत होते. आम्हला सांगितले होते समजूत काढून पाठी घेऊ, पण असे झाले नाही. त्यामुळे या प्रभागात मैत्री पूर्वक लढत लढायची, इथे 100% अंबरनाथ पॅटन चालणार, असे भाजप जिल्हा अध्यक्ष नंदू परब यांनी सांगितले. तरं यावर शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते हें पहावे लागेल.
Post a Comment
0 Comments