Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

केडीएमसी निवडणुकीसाठी उमेदवारांच्या दैनंदिन जमा खर्चाच्या नोंदीबाबत प्रशिक्षण संपन्न

                     ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 सुरळीतपणे पार पाडण्यासाठी तसेच या निवडणूकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांच्या जमा खर्चाच्या नोंदी, लेखे कसे ठेवावेत याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आज कल्याण पश्चिम येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. 


या प्रशिक्षणास राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे प्रतिनिधी, FST/VVT/VST पथकांचे पथक प्रमुखनिवडणूक निर्णय अधिकारी निहाय उमेदवारांचे लेखांकन करणारे लेखा पथकातील अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.FST/VVT/VST पथकांची कार्यपध्दती कशी असावी, उमेदवारांनी निवडणूकीकामी केलेल्या जमाखर्चाचे लेखे कसे ठेवावेत याबाबत उल्हासनगर महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी किरण भिलारे यांनी उपस्थितांना PPT च्या माध्यमातून मार्गदर्शन केले. या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रति उमेदवार रु. 11 लाख इतकी खर्चाची मर्यादा असून उमेदवारांनी बँकेत खाते उघडून सदर खर्च करावयाचा आहे. आज केलेला खर्च दुस-या दिवशी खर्च पथकाकडे सादर करायचा आहे अशी माहिती त्यांनी दिली.

यावेळी महापालिकेचे मुख्य लेखा परिक्षक सुरेश बनसोडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिग्विजय चव्हाण आणि उल्हासनगर महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी  किरण भिलारे यांनी उमेदवारांच्या प्रतिनिधींना समाधानकारक उत्तरे दिली.

Post a Comment

0 Comments