Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

              ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली (विद्या कुलकर्णी )

रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे शिक्षक आमदार, विधान परिषदेचे सदस्य व महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे संस्थापक माननीय श्री. ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे सर यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. गेली दहा वर्ष हा सोहळा आयोजित करण्यात येतो. कोकण विभागातील पाच जिल्ह्यांमधील आत्तापर्यंत पालघर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचाही स्वतंत्र असा गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा घेण्यात आला होता‌ परंतु गेली दहा वर्ष सातत्याने ठाणे जिल्ह्यातील सव्वाशे ते दीडशे गुणवंत शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्यात येतो. याही वर्षी 120 गुणवंत शिक्षकांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील तालुका निहाय प्रत्येक तालुक्यातील संस्था, महाविद्यालयीन प्राध्यापक, मुख्याध्यापक ,इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू माध्यमातील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळ्यांनी सन्मानित करण्यात येते. त्या वेळेत शाळांमधील शिक्षक हा पुढील पिढी घडवण्याचा मानबिंदू त्याचबरोबर संस्थाचालकांचे अथक प्रयत्न, त्याग ,परिश्रम यातून त्यांनी ज्या शाळा उभ्या केल्या तसेच इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज आय.टी.आय. कॉलेज या महाविद्यालयातील शिक्षकांनी खरोखरच आपल्या ज्ञानाच्या बळावर काही विद्यार्थी घडविले. त्यांना आपल्या आयुष्यातील तसेच त्यांच्या पंखांना बळ देण्याचं काम या शिक्षकांनी केलं. आयुष्यभर त्यांनी केलेल्या कार्याचा कुठेही नामोल्लेख केला जात नाही. परंतु शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी या शिक्षकांची पराकष्टा ,श्रम, मेहनत हेरली व त्यांच्या कार्याचा गौरव झाला पाहिजे यासाठी गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा घ्यावा असे निश्चित केले. त्यानुसार नामवंत व्यक्तींच्या हस्ते त्या गौरविल्या जाणाऱ्या शिक्षकांच्या कुटुंबातील व्यक्ती, शाळेतील व्यक्ती व मित्र परिवाराच्या समवेत संबंधित गुणवंत शिक्षकाला सन्मानपत्र, मेडल, शाल, पुष्पगुच्छ तर संस्थाचालकांना सन्मान पत्र ,ट्रॉफी, शाल ,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले .गुणवंत पुरस्काराच्या वेळी गुणवंत शिक्षकांना मानाचा फेटा बांधून त्यांच्या कार्याचा गौरव राज्यभर कसा पोहोचेल व त्याचा आदर्श राज्यात राहील .याप्रमाणे हा पुरस्कार सोहळा अत्यंत देखणा असा घेण्यात आला.

या कार्यक्रमासाठी अनेक नामवंत व्यक्तींनी आपली हजेरी लावली. आमदार बालाजी किणीकर, शिवसेना शिंदे गट गटनेते श्रीधर पाटील, कुळगाव बदलापूर माजी नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे रामभाऊ पातकर कुळगाव बदलापूर माजी नगराध्यक्ष माननीय वामन बारकू म्हात्रे अनेक नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका यांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून म्हात्रे सरांना शुभेच्छा दिल्या व गुणवंत शिक्षकांच्या कार्याचे गौरव केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री रविंद्र चव्हाण, श्री नितेश राणे, श्री भरत शेठ गोगावले,श्री कपिल पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक असल्याकारणाने फोनवरून गुणवंत शिक्षक व म्हात्रे सरांना शुभेच्छा दिल्याअशा स्वरूपात हा पुरस्कार सोहळा मोठ्या कौतुकाने घेण्यात आला.

Post a Comment

0 Comments