ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली परिसरात सर्वच पक्षांच्या उमेदवारांकडून निवडणूक प्रचाराला दणक्यात सुरुवात झाली असून सगळीकडे प्रचाराला जोर आला आहे त्यातच कल्याण प. येथील भगवा तलाव परिसरात प्रभाग क्र. ७ मधील महायुती द्वारे पुरस्कृत उमेदवार संदीप एकनाथ गायकर यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले. या शुभ प्रसंगी माजी मंत्री जगन्नाथ पाटील , माजी आमदार नरेंद्र पवार, महायुतीचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार संदीप एकनाथ गायकर,भाजपच्या उमेदवार सौ.हेमलता नरेंद्र पवार,भाजपाचे उमेदवार कु.शामल मंगेश गायकर ,शिवसेनेच्या उमेदवार विजयाताई अरविंद पोटे आदी उपस्थित होते.तसेच महायुतीतर्फे भाजपने आधी जाहीर केलेले नंतर माघार घेतलेले अधिकृत उमेदवार पंकज उपाध्याय हे ही उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार पंकज उपाध्याय यांच्या कार्यशैलीचे विशेष कौतुक केले. उपाध्याय यांनी कार्यकर्त्यांशी घनिष्ठ नाते जपले असून, ज्या कार्यकर्त्यांच्या जोरावर ते घडले त्या संदीप गायकर यांचे योगदान त्यांनी कायम लक्षात ठेवले असल्याचे श्री.जगन्नाथ पाटील यांनी सांगितले. तसेच उमेदवार पंकज उपाध्याय यांनी आपली उमेदवारी महायुती पुरस्कृत अपक्ष उमेदवार संदीप एकनाथ गायकर यांना सोडली त्याबद्दल त्यांचे कौतुकही केले. त्या अनुषंगाने नगारा चिन्हावर मत देऊन भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
.jpg)





Post a Comment
0 Comments